आरआरआर फेम Jr NTRच्या सिनेमातून Alia Bhattचा पत्ता कट, आता नव्या अभिनेत्रींचा शोध सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 18:31 IST2022-05-19T17:45:29+5:302022-05-19T18:31:12+5:30
साऊथमधील लोकप्रिय अभिनेता ज्युनियर एनटीआर सोबत आलिया भट मुख्य भूमिकेत असेल अशी काही दिवसांपासून चर्चा होती.

आरआरआर फेम Jr NTRच्या सिनेमातून Alia Bhattचा पत्ता कट, आता नव्या अभिनेत्रींचा शोध सुरु
जुनियर एनटीआर(JrNTR) 'आरआरआर' (RRR) नंतर आता आगामी 'NTR30' चित्रपटाबाबत चर्चेत आहे, ज्याचे नावअद्याप ठरलेले नाही. यापूर्वी या चित्रपटाबद्दल बोलले जात होते की यात बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट(Alia Bhatt)ची वर्णी लागणार आहे.
साऊथमधील सर्वात लोकप्रिय अभिनेता ज्युनियर एनटीआर सोबत आलिया भट मुख्य भूमिकेत असेल अशी काही दिवसांपासून चर्चा होती. मात्र ताज्या रिपोर्टनुसार आलियाचा या सिनेमातून पत्ता काट झाला आहे.
एनटीआरच्या आगामी चित्रपटात आलियाशिवाय श्रद्धा कपूर(Shraddha Kapoor)चेही नावही चर्चेत होते. ती NTR30 मध्ये मुख्य अभिनेत्री असेल असे बोलले जात होते. मात्र, आता ही बातमी निव्वळ अफवा असून ते सध्या तिच्या हिंदी सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तारखांची जुळवाजुळव न झाल्यामुळे ती सिनेमात दिसू शकत नाही.आता यावरून स्पष्ट झाले आहे की, 'RRR'च्या 'कोमराम भीम' या आगामी प्रोजेक्टमध्ये या दोन्ही अभिनेत्रींपैकी कोणीही त्याच्यासोबत नसेल.मेकर्स आता नव्या अभिनेत्रीच्या शोधात आहेत. कोराटाला शिव ज्याचा आचार्य नुकताच प्रदर्शित झाला, जो बॉक्स ऑफिसवर चांगलाच फ्लॉप झाला आहे. 140 कोटींचे बजेट असलेल्या आचार्यने निर्मात्यांना 100 कोटींचे नुकसान केले आहे. या चित्रपटात मेगास्टार चिरंजीवी आणि राम चरण होते. एसएस राजामौली दिग्दर्शित आरआरआरमध्ये चरण आणि तारक यांनी छाप पाडली.