वेश्या व्यवसायावर आधारित सिनेमा, दिवसा नाही रात्रीचं व्हायचं शूटिंग; मिळालेत ४९ पुरस्कार, तुम्ही पाहिलाय का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 16:32 IST2026-03-05T16:29:08+5:302026-03-05T16:32:35+5:30
वेश्या व्यवसायावर आधारित सिनेमा; राणी-दीपिकाने नाकारला अन् 'या' अभिनेत्रीचं फळफळलं नशीब, आयएमडीबीवर ७.६ रेटिंग

वेश्या व्यवसायावर आधारित सिनेमा, दिवसा नाही रात्रीचं व्हायचं शूटिंग; मिळालेत ४९ पुरस्कार, तुम्ही पाहिलाय का?
Bollywood Cinema: हल्ली ओटीटी असो किंवा थिएटर एकापेक्षा एक आणि सरस चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यात काही चित्रपट हे असतात ज्यांची बऱ्याच वर्षानंतरही चर्चा होत राहते. २०२२ साली प्रदर्शित झालेला असाच एक चित्रपट हिंदीमध्ये आला होता. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित होती. या चित्रपटाला आयएमडीबीवर ७.६ रेटिंग मिळाली आहे. त्यामुळे हा सिनेमा चर्चेत आला आहे.
दरम्यान, आपण ज्या चित्रपटाबद्दल बोलत आहोत तो दुसरा तिसरा चित्रपट आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहे.या चित्रपटाची कथा कामाठीपुरातील गंगूबाईच्या जीवनावर आधारित आहे, जिला तिच्या प्रियकराने किंवा पतीने केवळ १००० रुपयांना विकले होते आणि नंतर ती सेक्स वर्कर बनली होती. या चित्रपटात आलिया भटने गंगूबाईची भूमिका साकारली होती. चित्रपटाची कथा आलियाच्या व्यक्तिरेखेभोवती फिरते. चित्रपटात शंतनू माहेश्वरी, विजय राज, सीमा पाहवा, जिम सर्भ आणि अजय देवगण यांच्याही भूमिका आहेत.संजय लीला भन्साळी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.
दीपिका आणि राणीने चित्रपट नाकारला
इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, दीपिका पदुकोणला 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर देण्यात आली होती पण तिने काही कारणास्तव ती नाकारली. यापूर्वी दीपिकाने संजय लीला भन्साळींसोबत 'बाजीराव मस्तानी', 'राम लीला' आणि 'पद्मावत' सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. दीपिकानंतर 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटासाठी राणी मुखर्जीलाही संपर्क साधण्यात आला होता पण तिने देखील ही ऑफर नाकारल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर चित्रपट निर्मात्यांनी आलिया भट्टशी संपर्क साधला आणि तिने गंगूबाईची भूमिका करण्यास लगेचच होकार दिला.मिळालेल्या माहितीनुसार, 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटाचं शूटिंग पूर्णपणे रात्री करण्यात आला होतं, कारण कथेनुसार दिवसा शूट करणं शक्य नव्हतं.
आलिया भट्टला 'गंगूबाई काठियावाडी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.शिवाय तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला. या चित्रपटाला वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जवळपास ४९ पुरस्कार मिळाले. या चित्रपटाचे IMDb वर १० पैकी ७.६ इतकी रेटिंग मिळाली आहे.