मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2025 17:26 IST2025-10-24T17:26:04+5:302025-10-24T17:26:38+5:30
श्रद्धा कपूरसोबत 'स्त्री', तर आता आलिया भटसोबत 'चामुंडा' येणार?

मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
सध्या बॉलिवूडमध्ये मॅडॉक फिल्म्सची चलती आहे. 'स्त्री','स्त्री २','मुंज्या','भेडिया' आणि आता 'थामा' या त्यांच्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्स सिनेमांनी धुमाकूळ घातला. दरम्यान त्यांच्या आगामी 'शक्ती शालिनी' सिनेमाचीही घोषणा झाली ज्यात 'सैयारा' फेम अनीत पड्डाची निवड झाली आहे. याशिवाय दिनेश विजान आपल्या आणखी एका सिनेमात आलिया भटला कास्ट करणार असल्याची चर्चा आहे. या चर्चांवर दिग्दर्शक अमर कौशिक यांनी उत्तर दिलं आहे.
मॅडॉक हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा पुढचा सिनेमा 'चामुंडा'ची चर्चा आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमात आलिया भट मुख्य भूमिका साकारु शकते. दरम्यान आता दिग्दर्शक अमर कौशिक यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. आलिया भटच्या चर्चांवर ते म्हणाले, "जर असं झालं तर सगळ्यांना समजेलच. मी आताच काहीही सांगमार नाही. सगळं वेळेवर होईल. सध्या आम्ही फक्त सिनेमाच्या कहाणीवर लक्ष केंद्रित करत आहोत. नंतर कलाकारांचा विचार करणार आहोत. आम्ही कलाकारांना डोळ्यासमोर ठेवून स्क्रिप्ट किंवा गोष्ट लिहित नाही."
ते पुढे म्हणाले, "सिनेमाची स्केल आणखी मोठी असेल अशी आशा प्रेक्षक नक्कीच करु शकतात. आम्ही हा सिनेमा प्रेक्षकांसाठी, चाहत्यांसाठी बनवत आहोत. जर आमच्याकडून काही चूक झाली आणि आम्हाला ती ठीक करता आली नाही तर कृपया आम्हाला इन्स्टाग्राम किंवा अन्य प्लॅटफॉर्मवर कळवा. आमच्यासाठी प्रार्थना करा. आम्ही तुम्हाला सर्वात बेस्ट तेच देण्याचा प्रयत्न करु. आम्हाला दूषित व्हायचं नाही. आम्ही प्रामाणिक आहोत आणि प्रामाणिकच सिनेमा बनवू जसं आम्ही स्त्री बनवला होता. प्रेक्षकांकडूनही हीच अपेक्षा आहे. आम्ही त्यांना तेच देतो जे त्यांना हवं आहे."