आलिया भटचा जबरदस्त फिटनेस, शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 09:23 IST2025-02-10T09:23:28+5:302025-02-10T09:23:43+5:30

आलिया चाहत्यांना फिटनेसचे धडे देत आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन जीममधील वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर केला आहे.

alia bhat sharing fitness goals with fans shared workout video | आलिया भटचा जबरदस्त फिटनेस, शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ

आलिया भटचा जबरदस्त फिटनेस, शेअर केला वर्कआऊट व्हिडिओ

कलाकार त्यांच्या फिटनेसकडे कायमच विशेष लक्ष देताना दिसतात. फिट राहण्यासाठी डाएटसोबतच कलाकार वर्कआऊटही करतात. याचे व्हिडिओ आणि फोटोही कलाकार शेअर करत असतात. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भटदेखील तिच्या फिटनेसची काळजी घेताना दिसते. आलिया नियमित वर्कआऊट करते.

आलियाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियावरुन आलिया चाहत्यांच्या संपर्कात राहते. करिअर आणि वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांना देत असते. आता आलिया चाहत्यांना फिटनेसचे धडे देत आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन जीममधील वर्कआऊटचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये आलिया जबरदस्त वर्कआऊट करताना दिसत आहे. तिचा हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 


आलिया ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. स्टुडंट ऑफ द इयर सिनेमातून पदार्पण केलेल्या आलियाने अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. 'गंगुबाई काठियावाडी', 'राझी', 'जिगरा', 'ब्रह्मास्त्र', 'कलंक' अशा सिनेमांमधून तिने अभिनयाची छाप पाडली. आलिया 'तख्त', 'लव्ह अँड वॉर' या सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: alia bhat sharing fitness goals with fans shared workout video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.