रिचा चड्ढाला इम्प्रेस करण्यासाठी अली फजलनं केलं होतं बरंच काही, 'फुकरे'च्या सेटवर सुरु झाली लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 16:39 IST2023-12-16T16:37:22+5:302023-12-16T16:39:30+5:30

अली फजल आणि रिचा चढ्ढा हे बॉलिवूडमधील पावर कपलपैकी एक आहेत.

Ali fazal revealed he did many stupid thigs to impress richa chadha at the set of fukrey | रिचा चड्ढाला इम्प्रेस करण्यासाठी अली फजलनं केलं होतं बरंच काही, 'फुकरे'च्या सेटवर सुरु झाली लव्हस्टोरी

रिचा चड्ढाला इम्प्रेस करण्यासाठी अली फजलनं केलं होतं बरंच काही, 'फुकरे'च्या सेटवर सुरु झाली लव्हस्टोरी

अली फजल आणि रिचा चढ्ढा हे बॉलिवूडमधील पावर कपलपैकी एक आहेत. 'फुक्रे' चित्रपटाच्या सेटवर दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. पॉडकास्टवर अली फझलने रिचाला कसं इंप्रेस केलं याचा खुलासा केला. रिचा चड्ढाला इम्प्रेस करण्यासाठी अलीला बरीच मेहनत घेतल्याचं त्यांनी सांगितलं. 

रिचाला इम्प्रेस करण्यासाठी त्याने अनेक विचित्र गोष्टी केल्याचा खुलासा अलीने केला आहे. 'ओए लकी लकी ओए' आणि 'गँग्स ऑफ वासेपूर' सारख्या चित्रपटांमध्ये रिचा दमदार अभिनयाने अलीला खूप प्रेरणा मिळाली. अली म्हणाला,  “मला वाटतं मी तिला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत होतो. मला वाटले की ती मस्त बदमाश प्रकारची मुलगी आहे आणि मी कोणत्याही मुलीला असे वागताना पाहिले नव्हते. 

अली फजल पुढे म्हणाला, “मला आठवतं आम्ही फुकरे वाचत होतो आणि मी तिच्या शेजारी जाऊन का बसलो ते मला कळलं नाही. मला त्या संभाषणाचा भाग व्हायचे होते, आणि मी म्हणालो, 'अरे, तुला ही डिश हवी आहे? खरंतर ती डिश तिच्या जवळच ठेवलेली होती. मला राजमा अजिबात आवडायचा नाही आणि हे लोक रोज राजमा खायचे. 

अलीने सांगितले की, फुक्रेच्या म्युझिक लॉन्चवेळी तो वेड्यासारखा डान्स करत होता. त्याचा असा विश्वास होता की या कृतीने तो रिचाचं लक्ष वेधून घेईल आणि त्यांच्या नातेसंबंधातील एक महत्त्वपूर्ण क्षण होईल. मात्र रिचा अलीवर आधीपासूनच इम्प्रेस झाली होती. अली फजल आणि रिचा चढ्ढा यांचा विवाह ४ ऑक्टोबर २०२२ रोजी झाला होता. दोघांनी दिल्ली, मुंबई आणि लखनऊमध्ये प्री-वेडिंग फंक्शन होते.

Web Title: Ali fazal revealed he did many stupid thigs to impress richa chadha at the set of fukrey