कपूर खानदानातील लेकीसोबत अक्षय करणार होता लग्न, 'या' व्यक्तीमुळे मोडलं अभिनेत्याचं स्वप्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:02 IST2026-03-17T09:59:25+5:302026-03-17T10:02:10+5:30
Akshaye khanna: अक्षय आज ५० वर्षांचा असून तो अविवाहित आहे. परंतु, एकेकाळी तो बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत लग्न करायला तयार होता.

कपूर खानदानातील लेकीसोबत अक्षय करणार होता लग्न, 'या' व्यक्तीमुळे मोडलं अभिनेत्याचं स्वप्न
बॉलिवूडचा 'धुरंधर' अभिनेता अक्षय खन्ना (akshaye khanna) सध्या त्याच्या सिनेमामुळे चांगलाच चर्चेत आहे. आजवरच्या कारकिर्दीत अक्षयने अनेक सुपरहिट सिनेमा दिले. त्यामुळे त्याच्या करिअरविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. ९० च्या दशकात अक्षयची तरुणींमध्ये तुफान क्रेझ होती. त्याकाळी अक्षयचं नावदेखील अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं. अक्षयचं एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत लग्नदेखील ठरलं होतं. मात्र, ऐनवेळी त्यांच्या नात्यात वितुष्ट आलं आणि त्यांचं लग्न होता होता राहिलं.
अक्षय आज ५० वर्षांचा असून तो अविवाहित आहे. परंतु, एकेकाळी तो बॉलिवूडच्या एका लोकप्रिय अभिनेत्रीसोबत लग्न करायला तयार होता. इतकंच नाही तर दोघांच्या घरी लग्नाची बोलणीदेखील झाली होती. मात्र, या अभिनेत्रीच्या आईने ऐनवेळी नकार दिल्यामुळे त्यांचं लग्न झालं नाही.
रिपोर्टनुसार, अक्षय खन्ना आणि करिश्मा कपूर हे दोघे एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात होते. एका फोटोशूटदरम्यान त्यांच्या मैत्री झाली आणि त्यांच्यातील जवळीकता वाढली. विशेष म्हणजे त्यांचं नात रणधीर कपूर यांनाही मान्य होतं. त्यामुळे त्यांनी अक्षयच्या घरी लग्नासाठी बोलणीही सुरु केली होती. मात्र, करिश्माच्या आईमुळे बबितामुळे त्यांचं लग्न होऊ शकलं नाही.
करिश्माला त्यावेळी करिअरमध्ये चांगली संधी मिळत होती. तिच्या तुलनेत अक्षयच्या करिअरच्या ग्राफ फारसा चांगला नव्हता. त्यामुळे बबिताने या लग्नाला विरोध केला.विशेष म्हणजे बबिताच्या नकारानंतर करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचा साखरपुडा झाला. परंतु, त्यांचंही नातं फार काळ टिकलं नाही. दरम्यान, अखेर शेवटी करिश्माने संजय कपूरसोबत लग्नगाठ बांधली. त्यांना दोन मुलेदेखील आहेत. परंतु, २०१६ मध्ये ही जोडी कायदेशीररित्या विभक्त झाली. तर, अक्षय आजही अविवाहित आहे.