"मित्रा, तुला देवाची शपथ..."; अक्षय खन्नाच्या व्हायरल गाण्यामागील अर्थ माहितीये? वाचून डोकं चक्रावून जाईल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2025 13:37 IST2025-12-10T13:34:37+5:302025-12-10T13:37:07+5:30
अक्षय खन्ना ज्या Fa9la गाण्यावर नाचतो त्यामागील अर्थ भन्नाट आहे. तो जाणून घेतल्यावर तुम्हीही थक्क व्हाल

"मित्रा, तुला देवाची शपथ..."; अक्षय खन्नाच्या व्हायरल गाण्यामागील अर्थ माहितीये? वाचून डोकं चक्रावून जाईल
'धुरंधर' सिनेमातील Fa9la हे गाणं सध्या चांगलंच गाजतंय. या गाण्यावर अक्षय खन्नाने केलेला डान्स चांगलाच व्हायरल झाला आहे. या गाण्याचे शब्द आपल्याला कळत नसले तरी ऐकायला मजा येते. पण या बहरीन गाण्याचे शब्द आणि त्याचा अर्थ नेमका काय, असा प्रश्न सर्वांच्या मनात असेल. अखेर याचा उलगडा झाला आहे. या गाण्याचे मूळ शब्द आणि त्यामागचा अर्थ भन्नाट आहे. जाणून घ्या
Fa9la गाण्याचे शब्द आणि अर्थ
एका वेबसाईटने Fa9la गाण्याचे शब्द आणि त्याचा अर्थ सांगितला आहे. जो वाचून तुमचंही डोकं चक्रावून जाईल. या गाण्याचे मूळ शब्द पुढीलप्रमाणे:- याखी दूस दूस इंदी खोश फासला, याखी तफूज तफूज वल्लाह खोश रकसा, इंदी लक रकसा कविया या अल-हबीब, इस्महा सबूहा खतभा नसीब मिद यदक जिन्क ब्तातिहा कफ, वा हेज जितफिक ईल खल्लिक शदीद.
या गाण्याचा अर्थ पुढीलप्रमाणे:- मित्रा, जोरात नाच, आज मी भरपूर मस्ती करायच्या मूडमध्ये आहे... मित्रा, सर्व सोड, तुला देवाची शपथ, चल एक मस्त डान्स करु... मित्रा, तुझ्यासाठी माझ्याकडे एक जबरदस्त डान्स स्टेप आहे... त्याचं नाव सबूहा आहे, नशीबाने हे तुझ्यासाठीच लिहिलं आहे... तुझा हात वर कर आणि ताल धर... तुझ्या खांद्यांना जोरात हलव आणि तुझ्यातली एनर्जी अशीच राहूदे...
अशाप्रकारे Fa9la या गाण्याचा अर्थ एकदम खास आहे. एकूणच समोरच्याला आनंदाच्या प्रसंगात नाचण्यासाठी प्रोत्साहन द्यायला या गाण्याचा वापर होतो असं दिसतं. रॅपर फ्लिपरचीने हे गाणं गायलं आहे. हे गाणं 'धुरंधर' सिनेमामुळे चांगलंच व्हायरल झालंय. अक्षय खन्नाला या गाण्यात बेधुंदपणे नाचताना पाहून सर्वजण आनंदी झाले आहेत. सध्या 'धुरंधर' सिनेमामुळे मूळ गाण्यालाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. हे गाणं युट्यूब आणि इतर म्युझिक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.