'धुरंधर'नंतर अक्षय खन्ना 'या' तीन चित्रपटातून येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांसाठी मोठी अपडेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 18:45 IST2026-03-30T18:40:48+5:302026-03-30T18:45:39+5:30
आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा अक्षय आता २०२६ आणि २०२७ मध्ये एकापाठोपाठ एक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'धुरंधर'नंतर अक्षय खन्ना 'या' तीन चित्रपटातून येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, चाहत्यांसाठी मोठी अपडेट
Akshaye Khanna Upcoming Movies : आदित्य धरच्या 'धुरंधर' मधील 'रहमान डकैत' या भूमिकेनंतर अभिनेता अक्षय खन्ना सध्या बॉलिवूडचा सर्वात 'डिमांडिंग' अभिनेता बनला आहे. आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा अक्षय आता २०२६ आणि २०२७ मध्ये एकापाठोपाठ एक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'धुरंधर'च्या यशानंतर अक्षय खन्ना आता एका 'पॅन-इंडिया' चित्रपटात झळकणार आहे. 'महाकाली' मध्ये तो राक्षसांचे गुरू 'शुक्राचार्य' यांची तगडी नकारात्मक भूमिका साकारणार आहे. पूजा अपर्णा कोल्लुरू दिग्दर्शित हा चित्रपट मूळचा तेलुगू असला तरी, अक्षयच्या लोकप्रियतेमुळे तो आता हिंदीतही मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित केला जाणार आहे.
'महाकाली'नंतर अक्षयचा 'इक्का' (Ikka) प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात अक्षयची २९ वर्षांनंतर सनी देओलसोबत जोडी जमली आहे. सिद्धार्थ पी. मल्होत्रा दिग्दर्शित हा हाय-ओक्टेन ॲक्शन थ्रिलर थेट 'नेटफ्लिक्स' वर प्रदर्शित होणार आहे. यात दिया मिर्झा आणि संजीदा शेख यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'सेक्शन ३७५' मधील वकिलाच्या दमदार भूमिकेनंतर अक्षय खन्ना पुन्हा एकदा कोर्टरूम ड्रामा 'सेक्शन ८४' मध्ये वकिलाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २०२६ मध्ये प्रदर्शित होण्याची दाट शक्यता आहे.
अजय देवगणच्या 'दृश्यम २' मध्ये पोलीस अधिकाऱ्याची भूमिका गाजवल्यानंतर अक्षय खन्ना तिसऱ्या भागातही दिसेल, अशी सर्वांनाच खात्री होती. मात्र, चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. 'दृश्यम ३' मधून अक्षय खन्नाने माघार घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शूटिंग सुरू होण्याच्या अवघ्या ५ दिवस आधी अक्षयने हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. निर्मात्यांसोबत त्याचे 'सर्जनशील मतभेद' (Creative Differences) झाले असून, विशेषतः त्याच्या लूक आणि 'विग'च्या वापरावरून हे वाद विकोपाला गेले होते. आता अक्षयची जागा जयदीप अहलावत घेण्याची शक्यता असून, हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.