"आता डोळ्यांतून पाणी येईल..."; अक्षय खन्नाला गाताना पाहून चाहते भावुक; व्हिडीओ व्हायरल
By देवेंद्र जाधव | Updated: February 19, 2026 15:12 IST2026-02-19T15:06:14+5:302026-02-19T15:12:55+5:30
सध्या खलनायकी भूमिकांमुळे गाजत असलेल्या अक्षयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तो अत्यंत श्रवणीय आवाजात गाताना दिसतोय.

"आता डोळ्यांतून पाणी येईल..."; अक्षय खन्नाला गाताना पाहून चाहते भावुक; व्हिडीओ व्हायरल
'धुरंधर' सिनेमामुळे अक्षय खन्ना चांगलाच चर्चेत आला. २०२५ हे वर्ष खऱ्या अर्थाने अक्षयने गाजवलं. आधी फेब्रुवारी २०२५ मध्ये 'छावा' सिनेमात औरंगजेब साकारुन अक्षय खन्नाने प्रेक्षकांना धक्का दिला. पुढे २०२५ च्या अखेरीस 'धुरंधर' सिनेमात रहमान डकैतची खलनायकी भूमिका साकारुन अक्षयने पुन्हा एकदा प्रेक्षकांना थक्क केलं. सध्या खलनायकी भूमिकांमुळे गाजत असलेल्या अक्षयचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तो अत्यंत श्रवणीय आवाजात गाताना दिसतोय.
अक्षय खन्नाचा व्हिडीओ बघाच
अक्षय खन्ना काही वर्षांपूर्वी 'सा रे ग म प' या हिंदी रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये अक्षयने त्याच्या गाजलेल्या 'ताल' सिनेमातील एका गाण्याच्या ओळी गायल्या. ताल सिनेमातील 'नही सामने ये अलग बात है', हे गाणं चांगलंच गाजलं. याच गाण्यातील पहिल्या दोन ओळी अक्षयने गायल्या होत्या. 'देखो छोडके किस रास्ते वो जाते है, सारे रास्ते वापस मेरे दिल को आते है' या ओळी अक्षयने गाताच सर्व थक्क झाले आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अक्षय अभिनयात ग्रेट आहेच पण त्याचा श्रवणीय आवाज ऐकून सर्वांना सुखद धक्का बसला.
प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
''तो खूप चांगला गातोय, माझ्या डोळ्यांतून पाणी येण्यापासून कोणी थांबवू शकत नाही'''. ''रडू का मी आता. अगदी मूळ गायकाप्रमाणे हा गातोय.'', ''आम्हाला असा जुना अक्षय परत हवाय. तुझा तो चार्म आम्हाला पुन्हा बघायचाय'', अशा कमेंट करुन लोकांनी अक्षय खन्नाच्या गायनाचं कौतुक केलं आहे. अक्षयचं हे गाणं 'ताल' सिनेमातलं असून यात ऐश्वर्या राय आणि अनिल कपूर यांच्या भूमिका होत्या. सुभाष घाई यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता.