नववर्षी अक्षय-टायगरची चाहत्यांना खास भेट; 'बडे मियाँ छोटे मियाँ' सिनेमाची रिलीज डेट जाहीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 02:26 PM2024-01-01T14:26:23+5:302024-01-01T14:28:36+5:30

अक्षय आणि टायगरने 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची रिलीज डेट जाहीर केली आहे.

Akshay-Tiger special gift to fans on New Year 'Bade Mian Chhote Mian' release date announced! | नववर्षी अक्षय-टायगरची चाहत्यांना खास भेट; 'बडे मियाँ छोटे मियाँ' सिनेमाची रिलीज डेट जाहीर!

नववर्षी अक्षय-टायगरची चाहत्यांना खास भेट; 'बडे मियाँ छोटे मियाँ' सिनेमाची रिलीज डेट जाहीर!

देशभरात नववर्षाचं स्वागत मोठ्या उत्साहात झाल्याचं पाहायला मिळालं. अभिनेता अक्षय कुमारने नववर्षाची सुरुवात अगदी दणक्यात केली आहे. त्यानं नववर्षाच्या मुहूर्तावर चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज केले आहे.  अक्षय आणि टायगरने 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची रिलीज डेट जाहीर केली आहे. यासोबत अक्षयने चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अक्षय कुमारने त्याच्या अधिकृत  X हँडलवर टायगरसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये अक्षय फुल ॲक्शन मोडमध्ये टायगर श्रॉफसोबत जेट स्कीइंग करताना दिसत आहे. कॅप्शनमध्ये नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना अक्षय कुमार म्हणाला, ' छोट्या-छोट्या आनंदातून तुमचं नवं वर्ष मोठं व्हावं. 'बडे मियाँ छोटे मियाँ' कडून नवीन वर्षाच्या शुभेच्छा. ईदच्या दिवशी थिएटरमध्ये भेटा. लेट्स रॉक 2024'. अक्षय आणि टायगरचा 'बडे मियाँ छोटे मियाँ' ईदच्या दिवशी म्हणजेच 10 एप्रिल 2024 प्रदर्शित होणार आहे. 

खिलाडी अक्षय कुमार 2024 मध्ये अनेक सिनेमामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यांचे अनेक चित्रपट यंदा रिलीज होण्याच्या मार्गावर आहेत. या यादीत 'बडे मियाँ आणि छोटे मियाँ' सिनेमाचेही नाव आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ'ची निर्मिती वासू भगनानी आणि जॅकी भगनानी यांचं प्रॉडक्शन हाऊस पूजा एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली होत आहे. या सिनेमात जबरदस्त ॲक्शन सीन्स पाहायला मिळणार आहेत. 

स्टार कास्टबद्दल बोलायचे तर, अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसह सोनाक्षी सिन्हा, मानुषी छिल्लर यांच्याही भूमिका असणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. तर दिग्दर्शक अली अब्बास जफर पहिल्यांदाच दोन वेगवेगळ्या पिढ्यांतील दोन अभिनेत्यांचे दिग्दर्शन करत आहेत. त्यामुळे चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. 

Web Title: Akshay-Tiger special gift to fans on New Year 'Bade Mian Chhote Mian' release date announced!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.