अक्षय कुमारच्या या अभिनेत्रीनं ७ वेळा केलेला आत्महत्येचा प्रयत्न, इंटिमेट सीनसाठी केलेली जबरदस्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 10:58 IST2025-09-18T10:58:10+5:302025-09-18T10:58:41+5:30

सिनेइंडस्ट्रीत यश आणि स्टारडम मिळवणं सोपं नाही. त्याहूनही कठीण आहे ते स्थान टिकवून ठेवणं. आज आपण एका अशाच दक्षिण भारतीय अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

Akshay Kumar's actress Mohini attempted suicide 7 times, forced to do intimate scenes | अक्षय कुमारच्या या अभिनेत्रीनं ७ वेळा केलेला आत्महत्येचा प्रयत्न, इंटिमेट सीनसाठी केलेली जबरदस्ती

अक्षय कुमारच्या या अभिनेत्रीनं ७ वेळा केलेला आत्महत्येचा प्रयत्न, इंटिमेट सीनसाठी केलेली जबरदस्ती

सिनेइंडस्ट्रीत यश आणि स्टारडम मिळवणं सोपं नाही. त्याहूनही कठीण आहे ते स्थान टिकवून ठेवणं. आज आपण एका अशाच दक्षिण भारतीय अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत, जिने १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ही अभिनेत्री म्हणजे मोहिनी (South Actress Mohini). तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये सुपरस्टार्ससोबत काम केलं आहे. व्यावसायिक आयुष्यात खूप यशस्वी असूनही, तिचं वैयक्तिक जीवन खूप संघर्षमय होतं. त्याचा परिणाम तिच्या करिअरवरही दिसून आला. मोहिनीने आता एक दशकाहून अधिक काळ कोणत्याही चित्रपटात काम केलेलं नाही, परंतु सिनेमातील तिचं योगदान आणि तिचं अशात वैवाहिक जीवन आजही चर्चेत आहे.

महालक्ष्मी श्रीनिवासन म्हणून जन्मलेली मोहिनी मल्याळम सिनेमातील तिच्या सशक्त अभिनयासाठी ओळखली जाते. २० वर्षांच्या कारकिर्दीत मोहिनीने १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं. शिवाजी गणेशन, नंदमुरी बालकृष्ण, चिरंजीवी, मोहनलाल, ममूटी, शिवराजकुमार, विजयकांत, विष्णुवर्धन, विक्रम, रविचंद्रन, सरथकुमार, मोहन बाबू आणि सुरेश गोपी यांसारख्या अव्वल अभिनेत्यांसोबत त्यांनी काम केलं.

मोहिनीने केलेला आत्महत्येचा प्रयत्न
नुकत्याच सिनेमा विकटनला दिलेल्या एका मुलाखतीत मोहिनीने सांगितले की, १९९१ मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी तिचं लग्न झालं होतं. अभिनेत्रीने सांगितलं की ती पती आणि मुलांसोबत आनंदी कौटुंबिक जीवन जगत होती, पण तिला कळलं की ती डिप्रेशनमध्ये आहे. ती म्हणाली की, "माझ्या आयुष्यात काहीच चुकीचं घडत नव्हतं. तरीही मी डिप्रेशनमध्ये गेले. एक वेळ अशी आली की मी एकदा नाही, तर सात वेळा आत्महत्येचा प्रयत्न केला."

अक्षय कुमारसोबत या चित्रपटात केलेलं काम
मोहिनीने मुख्यतः मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं, ज्यात चिन्ना मारुमागल, आदित्य ३६९, हिटलर, नाडोडी, इन्नाथे चिंथा विषयम, सैन्यम, वेशम, ओरु मरावथूर कनवु, गादिबिदी आलिया, थायगम, लाली, निशब्द, पुधिया मन्नारगल, श्रीरामचंद्र, थाई मोझी, जासूस नारद आणि कलेक्टर यांचा समावेश आहे. मोहिनीने फक्त एका हिंदी चित्रपटात काम केलं आहे, ज्यात त्यांनी अक्षय कुमारसोबत अभिनय केला होता. १९९२ मध्ये आलेला 'डान्सर' हा मोहिनीच्या कारकिर्दीतील एकमेव बॉलिवूड चित्रपट आहे. या चित्रपटात मोहनीश बहल आणि दिलीप ताहिल यांनीही मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

इंटिमेट सीन का करावा लागला?
अवल विकटनशी बोलताना, मोहिनीने सांगितलं की 'उदल तझुवा' चित्रपटादरम्यान तिला इंटिमेट सीन्स करण्यास भाग पाडलं गेलं. दिग्दर्शक आरके सेल्वामणिने स्विमिंग सूटचा सीन ठरवला होता, पण मला त्यात अजिबात सोयीस्कर वाटत नव्हतं. ती म्हणाली की, "मी रडले आणि तो सीन करण्यास नकार दिला. शूटिंग अर्धा दिवस थांबवण्यात आलं. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला की मला पोहताही येत नाही! मी पुरुषांसमोर हे करू शकत नाही? त्या काळात महिला प्रशिक्षक जवळपास नव्हत्या. त्यामुळे मी असं काही करण्याची कल्पनाही करू शकत नव्हते. मला तो सीन करण्यासाठी 'भाग पाडलं' गेलं." पण नकार देऊनही तिला तो सीन शूट करावा लागला.

Web Title: Akshay Kumar's actress Mohini attempted suicide 7 times, forced to do intimate scenes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.