Akshay Kumar : ‘गुटख्याची जाहिरात करशील तर हेच होणार...’,  अक्षय कुमार ‘तो’ फोटो पाहून लोकांनी केलं ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 02:17 PM2022-05-29T14:17:53+5:302022-05-29T14:20:45+5:30

Akshay Kumar : अक्षयचा एक फोटो तुफान व्हायरल होतोय. या फोटोतील अक्षयचा अवतार बघून क्षणभर तुम्हालाही धक्का बसेल.  

akshay kumar unseen photo viral fans troll after pan masala advertisement | Akshay Kumar : ‘गुटख्याची जाहिरात करशील तर हेच होणार...’,  अक्षय कुमार ‘तो’ फोटो पाहून लोकांनी केलं ट्रोल

Akshay Kumar : ‘गुटख्याची जाहिरात करशील तर हेच होणार...’,  अक्षय कुमार ‘तो’ फोटो पाहून लोकांनी केलं ट्रोल

googlenewsNext

दमदार अभिनय आणि बेधडक स्वभावामुळे फॅन्सच्या मनावर अधिराज्य गाजवणारा बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमारवर (Akshay Kumar ) गेल्या काही दिवसांपासून चाहते काहीसे नाराज आहे. कारण आहे, पान मसाल्याची जाहिरात.  होय, पान मसाल्याच्या जाहिरातीमुळे अक्षय कुमार गेल्या काही दिवसांपासून ट्रोल होतोय. सोशल मीडियावर अनेकांनी ही नाराजी बोलून दाखवली आहे. अशात अक्षय कुमारचा असा एक फोटो समोर आला की, ट्रोलर्सच्या हाती जणू आयतं कोलित सापडलं.  

अक्षयचा हा फोटो तुफान व्हायरल होतोय. या फोटोतील अक्षयचा अवतार बघून क्षणभर तुम्हालाही धक्का बसेल.   फाटलेला मळलेला कुर्ता, विसकटलेले केस आणि हातात चहाचा कप घेऊन अक्षय बसलेला दिसतोय. त्याचा हा अवतार पाहून अनेक जणांना धक्का बसला. अनेकांनी यावरून अक्कीला ट्रोल करायला सुरूवात केली.

 ‘गुटख्याची जाहिरात करशील तर लोकांच्या नजरेतून उतरणारच ना,’ अशा कमेंट लोकांनी केल्या.  ‘लगता है किसी डायरेक्टरने चेक नहीं दिया,’ अशी कमेंट एका युजरने केली. ‘पैसा नहीं कमायेगा तो विमल कैसे खायेगा मेरी जान,’ अशी कमेंट अन्य एकाने केली. ‘विमल खाने का असर,’ अशी कमेंट करत एका युजरने त्याला ट्रोल केलं.


अक्षयचा हा फोटो कुठला? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कदाचित त्याच्या आगामी चित्रपटातील हा लुक असू शकतो. ‘सोसारई पोटरू’ या साऊथ स्टार सूर्याच्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय काम करतोय. हा फोटो याच चित्रपटाच्या सेटवरचा असल्याचंही म्हटलं जातंय. यात अक्षयसोबत राधिका मदान मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

सध्या अक्षय त्याच्या आगामी ‘पृथ्वीराज’चित्रपटामुळे चर्चेत आहे.  याशिवाय बच्चन पांडे, रक्षाबंधन, राम सेतू, सेल्फी, मिशन सिंड्रेला अशा अनेक चित्रपटांत तो झळकणार आहे. द एंड या सीरिजमधून तो डिजिटल डेब्यूही करतोय.

Web Title: akshay kumar unseen photo viral fans troll after pan masala advertisement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.