"माझ्या पत्नीनेही दोन इंडक्शन ऑर्डर केलेत...", LPG गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 13:46 IST2026-03-17T13:46:26+5:302026-03-17T13:46:51+5:30

गॅस कंपनी ऑफिसच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. यावर आता अक्षय कुमारने प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय कुमारने त्याच्या घरात सध्या काय परिस्थिती आहे, हेदेखील सांगितलं आहे.

akshay kumar talk about lpg gas cylinder crisis said my wife has order 2 induction | "माझ्या पत्नीनेही दोन इंडक्शन ऑर्डर केलेत...", LPG गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया

"माझ्या पत्नीनेही दोन इंडक्शन ऑर्डर केलेत...", LPG गॅस सिलेंडरच्या तुटवड्यावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया

अमेरिका-इस्रायल-इराण युद्ध सुरू होऊन आता १८ दिवस उलटले आहे. आखाती देशांमध्ये होणाऱ्या युद्धाचा परिणाम भारतातही दिसू लागला आहे. सागरी वाहतुक मार्गावर परिणाम झाल्याने देशात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे केवळ उद्योगधंदे आणि व्यावसायिकांवरच नाही तर घरगुती सिलेंडर मिळणंही कठीण होऊन बसलं आहे. गॅस कंपनी ऑफिसच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. यावर आता अक्षय कुमारने प्रतिक्रिया दिली आहे. 

अक्षय कुमारने त्याच्या घरात सध्या काय परिस्थिती आहे, हेदेखील सांगितलं आहे. मुंबई महानगरपालिकेने आयोजित केलेल्या मुंबई क्लीन लीग या कार्यक्रमात अक्षय कुमारने हजेरी लावली आहे. यावेळी अक्षयला सध्या देशात सुरू असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या तुटवड्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर तो उत्तर देत म्हणाला, "सध्या तरी माझ्या घरी गॅशरी काहीच अडचण नाहीये. पण माझ्या पत्नीनेही दोन इंडक्शन ऑर्डर केले आहेत". 

दरम्यान, अक्षय कुमार 'भूत बंगला' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमातून अक्षय कुमार आणि दिग्दर्शक प्रियदर्शन यांची जोडी बऱ्याच वर्षांनी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. १० एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 'वेलकम टू द जंगल', 'हैवान', 'हेरा फेरी ३' आणि 'भागम भाग २' हे त्याचे आगामी सिनेमे आहेत. 

Web Title : एलपीजी की कमी पर अक्षय कुमार की प्रतिक्रिया; पत्नी ने इंडक्शन ऑर्डर किया।

Web Summary : वैश्विक संघर्षों के कारण एलपीजी सिलेंडर की कमी के बीच, अक्षय कुमार ने खुलासा किया कि उनकी पत्नी ने दो इंडक्शन कुकटॉप का ऑर्डर दिया। उन्होंने मुंबई में एक कार्यक्रम के दौरान यह बात कही, साथ ही अपनी आगामी फिल्म 'भूत बंगला' का प्रचार भी किया।

Web Title : Akshay Kumar reacts to LPG shortage; wife orders induction.

Web Summary : Amidst LPG cylinder shortages due to global conflicts, Akshay Kumar reveals his wife ordered two induction cooktops. He mentioned this during a Mumbai event, while also promoting his upcoming film 'Bhoot Bangla'.