Akshay Kumarनं अंधेरीतलं घर विकलं इतक्या कोटींना; हा संगीतकार आहे नवीन मालक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 20:28 IST2022-09-24T20:27:55+5:302022-09-24T20:28:26+5:30
Akshay Kumar: अभिनेता अक्षय कुमारने अंधेरीमधील त्याचे घर कोट्यावधी रुपयांना विकले आहे.

Akshay Kumarनं अंधेरीतलं घर विकलं इतक्या कोटींना; हा संगीतकार आहे नवीन मालक
बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) आज कोट्यावधींचा मालक आहे. मुंबईत तो आलिशान घरात राहतो. अभिनय कौशल्याच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. अक्षय कुमारने काही वर्षांपूर्वी अंधेरीमध्ये एक घर विकत घेतले होते. गुंतवणूक म्हणून त्याने हे घर खरेदी केले होते. मात्र आता हे घर त्याने विकले आहे. एका प्रसिद्ध संगीतकाराला त्याने हे घर विकले असल्याचे सांगितले जात आहे.
अक्षय कुमारने अंधेरीमध्ये ४ कोटी १२ लाख रुपयांमध्ये घर खरेदी केले होते आणि आता त्याने या घराची विक्री केली आहे. त्याचे हे घर संगीतकार डब्बू मलिक यांनी विकत घेतले आहे. डब्बू मलिक हे अरमान मलिक व अमाल मलिकचे वडील आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंधेरी पश्चिममधील ट्रांसकॉन ट्रायम्फ टॉवरमध्ये अक्षयचे हे घर होते. १२८१ स्क्वेअर फिट असलेल्या घराला बाल्कनी आहे. ५९ फिटची ही बाल्कनी आहे. ऑगस्टमध्येच अक्षय व डब्बू यांच्यामध्ये घर खरेदी करण्याबाबत चर्चा झाली होती. डब्बू व त्यांची पत्नी ज्योति मलिक यांनी ६ कोटी रुपयांना हे घर खरेदी केले आहे.
या ठिकाणी आहे अक्षयची प्रॉपर्टी
इतकेच नाही तर अंधेरी पूर्व व पश्चिम परिसरामध्ये अक्षयने बरीच प्रॉपर्टी खरेदी केली आहे. बोरीवली, मुलुंड, जुहू परिसरामध्ये अक्षयने गुंतवणूक केली आहे. परदेशातही त्याने अलिशान घर घेतल्याची चर्चा आहे.