अक्षय कुमारचा लेक आरवला अभिनयक्षेत्रात नाही तर 'या' क्षेत्रात करायेच करिअर !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 06:00 PM2019-03-31T18:00:00+5:302019-03-31T18:00:00+5:30

आरव हा अक्षयचा मुलगा असल्याने त्याच्या बॉलिवूड एन्ट्रीच्याही चर्चा नेहमी रंगते. पण त्याने याबाबत अजून काही ठरवलं नाहीये.

Akshay kumar Says No Need To Discuss About Aarav Acting Carrier | अक्षय कुमारचा लेक आरवला अभिनयक्षेत्रात नाही तर 'या' क्षेत्रात करायेच करिअर !

अक्षय कुमारचा लेक आरवला अभिनयक्षेत्रात नाही तर 'या' क्षेत्रात करायेच करिअर !

googlenewsNext

आपल्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची मुलं मुलीसुद्धा अभिनय क्षेत्रात एंट्री मारणं ही काही नवी बाब राहिली नाही. सगळ्याच कलाकारांची मुलं सध्या बॉलिवूडमध्ये एंट्री करणार असल्याच्या चर्चा रंगत असताना अक्षय कुमारचा मुलगा आरवला मात्र अभिनयक्षेत्रात नाही तर कराटेमध्ये करिअर करण्याचा त्याचा निर्धार आहे. आरव हा अक्षयचा मुलगा असल्याने त्याच्या बॉलिवूड एन्ट्रीच्याही चर्चा नेहमी रंगते. पण त्याने याबाबत अजून काही ठरवलं नाहीये. पण तो सध्या लेखक होण्याच्या मार्गावर आहे. काही दिवसांपूर्वी चर्चा झाली होती की, आरव एक नॉव्हेल लिहितो आहे.

तसेच नुकत्याच एका कार्यक्रमात अक्षयला आरवच्या बॉलिवूड डेब्युविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अक्षयने म्हटले होते की, आरव हा फक्त 16 वर्षाचा आहे. त्यामुळे त्याने डॉक्टर बनावे की पेंटर किंवा मग आणखीन काही तो सर्वस्वी आरवचा निर्णय आहे. तसेच आरवने देखील अक्षयने त्याच्या करिअरच्याबाबतीत कोणताच दबाव टाकलेला नाही. मुळात आरवने सांगितले की, मला ब्रूसली सारखे बनायचे आहे. त्यासाठी मी प्रयत्न करत आहे. अभिनयक्षेत्रात  करिअर करायचे की नाही. सध्या तरी ठरवले नसल्याचेही तो म्हणाला.

गेल्या काही दिवसांपासून आरवबाबत आणखीन एक चर्चा होते की, आरव एका बॉलिवूड अभिनेत्रीवर चांगलाच फिदा झाला होता. एका अभिनेत्रीच्या आणि तिच्या कामाच्या प्रेमात पडला होता. पण हे त्याचं प्रेम एकतर्फी होतं. त्याच्या मनात जागा मिळवणारी ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेत्री आलिया भट्ट होती. मीडिया रिपोर्टनुसार, आरवला आलिया खूप पसंत आहे. त्याने हेही मान्य केलं की, आलियाला तो एक फॅन म्हणून पसंत करतो. कारण त्याला आलियाची अॅक्टींग फार आवडते. तो तिचा इतका मोठा फॅन आहे की, त्याची आलियासोबत डेटला जाण्याची इच्छा आहे.        

Web Title: Akshay kumar Says No Need To Discuss About Aarav Acting Carrier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.