परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 16:55 IST2025-06-17T16:55:14+5:302025-06-17T16:55:59+5:30

परेश रावल यांनी सिनेमा सोडल्यानंतर बराच वाद झाला. आता अक्षय म्हणाला...

Akshay Kumar reacts to controversy with Paresh Rawal oon hera pheri 3 says fingers crossed | परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी या तिकडीने  'हेरा फेरी' (Hera Pheri) सिनेमातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. काही वर्षांनी आलेला 'फिर हेरा फेरी'ही तेवढाच चालला. आता चाहत्यांचं 'हेरा फेरी ३'कडे लक्ष लागलं आहे. मात्र परेश रावल यांनी सिनेमा सोडल्याने सर्वांना धक्का बसला आहे. त्यांच्या बाबुराव आपटे भूमिकेची जादू आजही कायम आहे. परेश रावल यांनी सिनेमा सोडल्यानंतर बराच वाद झाला. अक्षयने  (Akshay Kumar) त्यांच्यावर नुकसानभरपाईचा दावा केला. या सर्व प्रकरणावर आता अक्षयने मौन सोडलं आहे.

'पिंकव्हिला'ला दिलेल्या मुलाखतीत अक्षय कुमारला 'हेरा फेरी ३'वर प्रश्न विचारण्यात आला. सिनेमा नक्की येणार आहे का? नक्की काय घडतंय? यावर तो म्हणाला, ""जे घडतंय ते तुमच्यासमोरच घडतंय. तुम्हा माध्यमांना सगळं माहितच आहे. सगळं काही ठीक व्हावं अशीच माझीही आशा आहे. मला खात्री आहे की सगळं चांगलं होईल."

परेश रावल यांनी का सोडला  'हेरा फेरी ३'?

परेश रावल यांनी  'हेरा फेरी ३' मानधनाच्या कारणामुळे सिनेमा सोडला का? अशी शक्यता व्यक्त केली जात होती. यावर परेश रावल म्हणाले, "प्रेक्षकांच्या प्रेमाची तुलना पैशांसोबत होऊच शकत नाही. सध्या मला ही भूमिका करायची नाही इतकंच यामागचं कारण आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला पण मला खरोखरंच या घडीला ही भूमिका साकारायची इच्छा नाही असंच मी त्यांना सांगितलं. आम्ही सोबत अनेक सुपरहिट सिनेमे केले आहेत आणि यापुढेही करु. आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत आणि होणारही नाहीत."a

Web Title: Akshay Kumar reacts to controversy with Paresh Rawal oon hera pheri 3 says fingers crossed