अक्षय कुमारचे फोटो क्लिक करून पापाराझी 'इतके' पैसे कमवतात, अभिनेत्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 15:42 IST2026-03-15T14:23:53+5:302026-03-15T15:42:27+5:30

अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयासोबतचं दिलदार स्वभावासाठीही ओळखला जातो.

Akshay Kumar Reaction On Paparazzi Culture Bollywood Interview | अक्षय कुमारचे फोटो क्लिक करून पापाराझी 'इतके' पैसे कमवतात, अभिनेत्याचा खुलासा

अक्षय कुमारचे फोटो क्लिक करून पापाराझी 'इतके' पैसे कमवतात, अभिनेत्याचा खुलासा

बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणून अक्षय कुमारला (Akshay Kumar) संबोधलं जातं. अभिनयक्षेत्रामध्ये तो गेली ३५ वर्ष सातत्याने काम करत आहे. १९९१मध्ये  सौगंध चित्रपटामधून करिअरला सुरुवात करणाऱ्या अक्षयनं आतापर्यंत मोहरा, जानवर, धडकन, अंदाज, फिर हेरा फेरी, गरम मसाला, अजनबी, भूल भुलैया, हाऊसफुल यांसारखे अनेक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. अक्षय कुमार हा त्याच्या अभिनयासोबतचं दिलदार स्वभावासाठीही ओळखला जातो.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत अक्षयने पापाराझी संस्कृतीवर भाष्य करताना अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. सेलिब्रिटी अनेकदा गोपनीयतेची तक्रार करत असताना अक्षयने मात्र याकडे पाहण्याचा एक वेगळा आणि सकारात्मक दृष्टिकोन मांडला. 'इंडिया टुडे'ला दिलेल्या मुलाखतीत अक्षयला विचारण्यात आले की, जेव्हा पापाराझी त्याचे किंवा त्याच्या कुटुंबाचे फोटो काढतात, तेव्हा त्याला त्रास होतो का? यावर अक्षय म्हणाला, "एका छायाचित्रकाराला एक फोटो क्लिक करण्यासाठी साधारण ३,५०० ते ४,००० रुपये मिळतात. जर माझा फोटो काढल्याने त्या गरीब माणसाचे घर चालत असेल, तो आनंदी होत असेल, तर मला फोटो देण्यात काय अडचण आहे? मी छान कपडे घालून बाहेर येतो, तेव्हा त्यांनी फोटो काढण्यात काहीच गैर नाही".

अक्षय पुढे म्हणाला, "गोपनीयतेचा अर्थ काय? जर तुम्ही तुमच्या पत्नी आणि मुलांसह सार्वजनिक ठिकाणी बाहेर जात असाल, तर तिथे गोपनीयता कशी उरणार? उलट, जर तुम्ही बाहेर गेलात आणि कोणीही तुम्हाला ओळखलं नाही किंवा तुमचे फोटो काढले नाहीत, तर ती कलाकारासाठी सर्वात मोठी समस्या आणि चिंतेची बाब आहे. लोक मला ओळखतात आणि माझे फोटो काढतात, हे मी माझे भाग्य समजतो". अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील अशा मोजक्या अभिनेत्यांपैकी एक आहे, जो पापाराझींशी नेहमीच हसतमुखानं संवाद साधतो. तो कधीही त्यांच्यासाठी पोझ देण्यास नकार देत नाही.
 

Web Title : अक्षय कुमार ने बताया, कैसे पैपराजी उनकी फोटो से कमाते हैं.

Web Summary : अक्षय कुमार ने पैपराजी संस्कृति पर खुलकर बात की, बताया कि कैसे फोटोग्राफर उनकी तस्वीरों से अच्छी कमाई करते हैं। उन्होंने सार्वजनिक जगहों पर गोपनीयता की चिंताओं को खारिज करते हुए उनके काम को सराहा।

Web Title : Akshay Kumar reveals paparazzi earnings from his photos.

Web Summary : Akshay Kumar openly discussed paparazzi culture, revealing photographers earn significantly from his pictures. He embraces their work, valuing recognition and the support it provides, dismissing privacy concerns in public spaces.