अक्षय कुमारने ट्विंकलसोबतच्या नात्याबाबत केला हा मोठा खुलासा, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2019 14:41 IST2019-07-23T14:38:06+5:302019-07-23T14:41:00+5:30

अक्षय कुमार आणि ट्विंकल खना बॉलिवूडमधील बेस्ट कपल पैकी एक आहेत. दोघांमध्ये जबरदस्त बॉडिंग आहे.

Akshay Kumar made a big reveal about his relationship with Twinkle | अक्षय कुमारने ट्विंकलसोबतच्या नात्याबाबत केला हा मोठा खुलासा, वाचा सविस्तर

अक्षय कुमारने ट्विंकलसोबतच्या नात्याबाबत केला हा मोठा खुलासा, वाचा सविस्तर

अक्षय कुमार आणि ट्विंकल खना बॉलिवूडमधील बेस्ट कपल पैकी एक आहेत. दोघांमध्ये जबरदस्त बॉडिंग आहे. नुकताच अक्षयने ट्विंकलसोबत असलेल्या बॉडिंगला घेऊन एक मोठा खुलासा केला आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार अक्षयने सांगितले की ट्विंकल त्याला अनेक गोष्टींसाठी मार्गदर्शन करते. मात्र यावेळी अक्षयने हे सुद्धा सांगितले की कामाशी संबंधीत प्रत्येक गोष्ट तो ट्विंकलसोबत शेअर करत नाही. 


अक्षय म्हणाला, माझ्या करिअरमध्ये माझी पत्नी ट्विंकलची महत्त्वाची भूमिका आहे. असे नाही की मी प्रत्येक सिनामाच्या कथेबाबत तिच्याशी चर्चा करतो. पण हा, मी तिची प्रत्येक गोष्ट लक्षात ठेवतो. 


ट्विंकलला एक अभिनेत्री म्हणून यश मिळाले नसले तरी एक लेखिका म्हणून तिने चांगलाच नावलौकिक मिळवला आहे. तिच्या फनीबोन्स या पुस्तकाला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. 


काही दिवसांपूर्वीचे अक्षयने  फोर्ब्स मॅगझीनच्या यादीत  33 वे स्थान मिळवले. बॉलिवूडच्या तिन्ही खानांना मागे टाकत अक्षयने या यादीत स्थान मिळवले आहे. वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर  अक्षय कुमार लवकरच 'लक्ष्मी बॉम्ब'मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत अभिनेत्री कियारा आडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट तमीळ कॉमेडी हॉरर सिनेमा 'कंचना'चा रिमेक आहे.  या चित्रपटाचे शूटिंग एप्रिल महिन्यातच सुरु झाले आहे. 

Web Title: Akshay Kumar made a big reveal about his relationship with Twinkle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.