'बिग बॉस १८'च्या सेटवरुन अक्षय कुमार शूटिंग न करताच गेला, कारण ठरला सलमान खान! नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 15:50 IST2025-01-20T15:49:27+5:302025-01-20T15:50:03+5:30
'बिग बॉस १८'च्या सेटवर आला पण शूटिंग करताच अक्षयला निघावं लागलं. असं काय घडलं (bigg boss 18, akshay kumar)

'बिग बॉस १८'च्या सेटवरुन अक्षय कुमार शूटिंग न करताच गेला, कारण ठरला सलमान खान! नेमकं काय घडलं?
'बिग बॉस १८' ची चांगलीच चर्चा झाली. कालच या शोचा ग्रँड फिनाले सोहळा पार पडला. करणवीर मेहराने 'बिग बॉस १८'ची ट्रॉफी उचलली. 'बिग बॉस १८' सलमान खानने त्याच्या होस्टिंगद्वारे पुन्हा एकदा गाजवला. 'बिग बॉस १८'च्या सेटवर काल अक्षय कुमार-वीर पहारिया हे दोन कलाकार त्यांच्या आगामी 'स्काय फोर्स' सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आले होते. परंतु शेवटी फक्त वीरने सिनेमाचं शूटिंग केलं. अक्षय कुमार 'बिग बॉस १८'च्या सेटवर थांबला नाही. याचं कारण ठरला सलमान खान. काय घडलं नेमकं?
अक्षय 'बिग बॉस १८'च्या सेटवर शूटिंग न करताच गेला
झालं असं की, अक्षय कुमार त्याच्या आगामी 'स्काय फोर्स' सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी 'बिग बॉस १८'च्या सेटवर हजर होता. ठरलेल्या वेळेनुसार अक्षय आणि वीर सेटवर पोहोचले होते. परंतु सलमान खानला पोहचायला उशीर झाला. त्यामुळे अक्षय शूटिंग न करता निघून गेला. पुढे वीरने सलमानसोबत 'बिग बॉस १८'चं शूटिंग केलं. याविषयी स्वतः सलमानने 'बिग बॉस १८'च्या मंचावर खुलासा केला.
सलमानने सांगितला किस्सा
सलमानसोबत वीर पहारिया 'बिग बॉस १८'च्या मंचावर हजर होता. तेव्हा सलमान म्हणाला की, "वीर इथे त्याच्या आगामी स्काय फोर्स सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी आला होता. हा सिनेमा २४ जानेवारीला रिलीज होतोय. या सिनेमात माझा मित्र अक्षय कुमारही आहे. तो सुद्धा इथे मंचावर उपस्थित असता पण मला यायला उशीर झाला. अक्षय कमिटमेंट पाळण्यात एकदम पक्का असल्याने त्याला दुसऱ्या एका फंक्शनला जायचं असल्याने तो निघून गेला." अशाप्रकारे अक्षय निघून का गेला याचं कारण उघड झालंय.