अक्षय कुमारच्या हिरोईनने क्रिकेटरच्या प्रेमात पडून सोडली होती इंडस्ट्री, आता आहे कोट्यावधीची मालकीन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 17:44 IST2022-06-14T17:39:31+5:302022-06-14T17:44:59+5:30

Actress Farheen : फरहीनने 1992 मध्ये आलेल्या 'जान तेरे नाम' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. या पहिल्याच सिनेमातून ती स्टार बनली होती. फरहीनने तिच्या सुरूवातीच्या सिनेमात अक्षय कुमार आणि रोनित रॉयसारख्या स्टार्ससोबत काम केलं.

Akshay Kumar heroine Farheen left the film industry in love with a cricket player latest photo viral | अक्षय कुमारच्या हिरोईनने क्रिकेटरच्या प्रेमात पडून सोडली होती इंडस्ट्री, आता आहे कोट्यावधीची मालकीन

अक्षय कुमारच्या हिरोईनने क्रिकेटरच्या प्रेमात पडून सोडली होती इंडस्ट्री, आता आहे कोट्यावधीची मालकीन

Actress Farheen : बॉलिवूड इंडस्ट्रीचा 90चा काळ फारच खास होता. या काळातील सिनेमे, कलाकार आणि गाणी आजही पसंत केली जातात. काही अभिनेत्री अशा होत्या ज्यांनी मोजकेच सिनेमे करून फॅन्सना वेड लावलं होतं. तर काही अभिनेत्री चार-पाच सिनेमे करून इंडस्ट्रीतून गायब झाल्या. यापैकी एक अभिनेत्री म्हणजे फरहीन. 

फरहीनने 1992 मध्ये आलेल्या 'जान तेरे नाम' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. या पहिल्याच सिनेमातून ती स्टार बनली होती. फरहीनने तिच्या सुरूवातीच्या सिनेमात अक्षय कुमार आणि रोनित रॉयसारख्या स्टार्ससोबत काम केलं. जेव्हा तिचं करिअर यशाच्या शिखरावर होतं तेव्हा तिने इंडस्ट्री सोडली आणि लग्न केलं. फरहीन आता 24 वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर आहे. 

फरहीनने 'जान तेरे नाम' सिनेमानंतर 'सैनिक', 'नजर के सामने', 'फौज', 'दिल की बाजी' आणि 'आग का तूफान' सारख्या सिनेमात काम केलं. साउथमधूनही तिला अनेक ऑफर्स आल्या होत्या आणि तिने काही सिनेमेही केले. तेव्हाच तिची भेट क्रिकेटर मनोज प्रभाकरसोबत झाली आणि त्याच्या प्रेमात पडली. फरहीनने आपलं करिअर सोडून मनोजसोबत लग्न केलं.

फरहीन प्रभाकर आता सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव असते आणि तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत असते. फरहीन प्रभाकर नावाने तिचं इन्टा अकाउंट आहे. सध्या ती फॅमिली लाइफ एन्जॉय करत आहे आणि बिझनेस सांभाळत आहे. फरहीनची हर्बल स्कीन केअर प्रॉडक्ट्स नावाने नॅच्युरल हर्बल नावाची कंपनी आहे. ही ती पती मनोज प्रभाकरसोबत मिळून चालवते.

दोघांची मुलंही आता मोठी झाली आहे. आता पुन्हा तिला आपल्या पहिल्या प्रेमाकडे म्हणजे अभिनयाकडे वळायचं आहे. तिला सिनेमात काम करायचं आहे. सध्या ती एखाद्या चांगल्या प्रोजेक्टची वाट बघत आहे.

Web Title: Akshay Kumar heroine Farheen left the film industry in love with a cricket player latest photo viral