लवकरच जमीनदोस्त होणार अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज'चा सेट, या कारणामुळे घेण्यात आला निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2020 15:43 IST2020-05-26T15:15:40+5:302020-05-26T15:43:14+5:30
लवकरच पृथ्वीराजचा पॅलेस लवकरच जमीनदोस्त करण्यात येणार आहे.

लवकरच जमीनदोस्त होणार अक्षय कुमारच्या 'पृथ्वीराज'चा सेट, या कारणामुळे घेण्यात आला निर्णय
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार लॉकडाऊनमुळे सध्या कुटुंबीयांसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करतो आहे. लॉकडाऊनमुळे त्याचा आगामी सिनेमा पृथ्वीराजचे शूटिंग अडकले आहे. अक्षय कुमारच्या सूर्यवंशी सिनेमाची रिलीज डेटदेखील पुढे ढकलण्यात आली आहे. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार लवकरच लवकरच पृथ्वीराजचा पॅलेस लवकरच जमीनदोस्त करण्यात येणार आहे. जून महिनासुरु झाला की पावसाला सुरुवात होणार त्यामुळे पृथ्वीराजची टीम पॅलेस जमीनदोस्त करण्याच्या निर्णयावर पोहोचली आहे. रिपोर्टनुसार गेल्या दोन महिन्यांपासून परिस्थितीत सकारात्मक बदल होतील अशी आशा होती. काही आठवड्यात पावसाला सुरुवात होईल त्यामुळे सेटला सुरक्षित ठेवण आवाहानत्मक होईल.
जर शूटिंग पुन्हा सुरु झाले तर इनडोर सेट लावण्यात येईल अशी माहिती आहे. पृथ्वीराज दिवाळीत रिलीज होणार मात्र कदाचित याची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येई शकते.
पृथ्वीराज चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सच्या बॅनरअंतर्गत होत असून हा चित्रपट चौहान वंशाच्या हिंदू क्षत्रिय राजा पृथ्वीराज चौहान यांच्या जीवनावर आधारीत आहे. या चित्रपटात अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारणार आहे आणि मानुषी छिल्लर राणी संयोगिताची भूमिका निभावणार आहे.