अक्षय कुमारसोबत 'बेल बॉटम'मध्ये दिसणार नोरा फतेही? समोर आलं सत्य....

By अमित इंगोले | Updated: November 6, 2020 11:52 IST2020-11-06T11:51:50+5:302020-11-06T11:52:02+5:30

काही बातम्या समोर आल्या होत्या की, या सिनेमात अभिनेत्री नोरा फतेही दिसणार आहे. या सिनेमात ती पहिल्यांदा अक्षय कुमारसोबत काम करणार अशी चर्चा होती.

Akshay Kumar film Bell Bottom Nora Fatehi in film what is true | अक्षय कुमारसोबत 'बेल बॉटम'मध्ये दिसणार नोरा फतेही? समोर आलं सत्य....

अक्षय कुमारसोबत 'बेल बॉटम'मध्ये दिसणार नोरा फतेही? समोर आलं सत्य....

अभिनेता अक्षय कुमारच्या आगामी 'बेल बॉटम' सिनेमाची फॅन्समध्ये चांगलीच उत्सुकता वाढली आहे. सिनेमाचे अनेक पोस्टर आणि त्यातील अक्षय कुमारच्या लूकने सोशल मीडियावर आधीच धमाका केला आहे. टीझरने ही उत्सुकता आणखीन ताणून धरली आहे. अशात काही बातम्या समोर आल्या होत्या की, या सिनेमात अभिनेत्री नोरा फतेही दिसणार आहे. या सिनेमात ती पहिल्यांदा अक्षय कुमारसोबत काम करणार अशी चर्चा होती. त्याबाबत आता खुलासा करण्यात आला आहे.

नोराच्या फॅन्समध्ये ही बातमी परसताच याबाबत नोराच्या मॅनेजरने खुलासा केला आहे. आता असा दावा केला जात आहे की, नोरा अक्षय कुमारसोबत 'बेल बॉटम' मध्ये दिसणार नाही. अशी माहिती देणाऱ्या सर्व बातम्या फेटाळण्यात आल्या आहेत. जारी करण्यात आलेल्या स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आलं आहे की, आम्हाला हे स्पष्ट करायचं आहे की, नोरा फतेही 'बेल बॉटम' चा भाग नाहीये. अशी माहिती देणाऱ्या बातम्या खोट्या आहेत.  (VIDEO : नोरा फतेहीपेक्षा जराही कमी नाही तिचा डान्स पार्टनर, दोघांची केमिस्ट्री पाहून व्हाल थक्क)

नोराच्या टीमकडून जारी करण्यात आलेल्या या माहितीमुळे तिचे फॅन्स निराश झाले आहेत. नोराने फारच कमी वेळेत मोठी लोकप्रियता मिळवली आहे. अशात तिचं एखाद्या सिनेमासोबत नाव जोडलं जात असल्याने तिचे इमेज आणखी मोठी होते. पण नोराच्या फॅन्सना यासाठी थोडी आणखी वाट बघावी लागणार आहे. (VIDEO : नोरा आणि नताशाचा 'साकी साकी' गाण्यावर डान्स मुकाबला, एकदा बघाल बघतच रहाल.....)

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून नोरा चांगलीच चर्चेत आहे. ती काही दिवस इंडियाज बेस्ट डान्सर शोची जज बनली होती. यातील तिचे परफॉर्मन्सही फॅन्सना खूप आवडले होते. त्यानंतर तिचं गायक गुरूं रंधावासोबतचं 'नाच मेरी राणी' हे गाणंही सुपरहिट ठरलं. 

तेच 'बेल बॉटम'बाबत सांगायचं तर या सिनेमाचं दिग्दर्शन रंजीत एम तिवारी करत आहे. सिनेमात अक्षय कुमारसोबत वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि लारा दत्ता या तीन अभिनेत्री दिसणार आहेत. हा सिनेमा पुढील वर्षी २ एप्रिलला रिलीज होणार आहे.
 

Web Title: Akshay Kumar film Bell Bottom Nora Fatehi in film what is true