बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारनं कोरोनाला हरवलं; नऊ दिवसांनंतर रिपोर्ट 'निगेटिव्ह'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2021 17:40 IST2021-04-12T17:38:20+5:302021-04-12T17:40:01+5:30
Akshay kumar discharged from hospital tests corona negative :कोरोनाची लागण होण्यापूर्वी अक्षय कुमार रामसेतू सिनेमाचे शूटिंग करत होता.

बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमारनं कोरोनाला हरवलं; नऊ दिवसांनंतर रिपोर्ट 'निगेटिव्ह'
अलीकडेच अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर तो उपचार घेण्यासाठी तो रुग्णलायत दाखल झाला होता. यानंतर त्याचे चाहते सोशल मीडियावर तो लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत होते. अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अक्षय कुमारचाी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याचे सांगितलं आहे.
एका कार्टूनचा फोटो शेअर करत ट्विंकल खानने लिहिले, निरोगी आणि सुरक्षित... पुन्हा त्याला माझ्याभोवती बघून आनंद झाला. ' यासह, तिने #alliswell चा टॅग देखील दिला आहे. ही पोस्ट पाहून अक्षयचे चाहते आनंदित झाले आहेत. बरेच चाहते देवाचे आभार मानत आहेत, तर काहींनी कमेंट केल्या आणि लिहिले - 'ग्रेट न्यूज'. अक्षयचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह येणं ही चाहत्यासांठी आनंदाची बातमी आहे.
'रामसेतू'च्या शूटिंग दरम्यान झाली होती लागण
कोरोनाची लागण होण्यापूर्वी अक्षय कुमार रामसेतू सिनेमाचे शूटिंग करत होता. याच दरम्यान त्याची टेस्ट पॉझिटीव्ह आली होती. अक्षय शिवाय 'राम सेतू' चित्रपटातील सेटवरील तब्बल ४५ जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. चित्रपटाच्या सेटवर इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचा विस्फोट झाल्यामुळे चित्रीकरण थांबविण्यात आले होते.