अक्षय कुमारचा लेकीला पाहिलंत?,आई ट्विंकलची आहे हुबेहुब कार्बन कॉपी; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2022 16:53 IST2022-12-23T16:33:30+5:302022-12-23T16:53:36+5:30
सोशल मीडियावर कायम स्टार किडची चर्चा रंगत असते. मात्र, अक्षय कुमारची मुलं लाइमलाइटपासून दूर राहणं पसंत करतात.

अक्षय कुमारचा लेकीला पाहिलंत?,आई ट्विंकलची आहे हुबेहुब कार्बन कॉपी; व्हिडीओ व्हायरल
अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना यांनी आपल्या दोनही मुलांना कायम लाईमलाईट पासून दूर ठेवणं पसंत केलं. अलीकडेच अक्षय मुलगी नितारासोबत स्पॉट झाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालं. व्हिडीओमध्ये अक्षय निताराचा हात पकडून चालताना दिसतोय. नितारा आता बरीच मोठी झाली आहे, वडिलांच्या खांद्यापर्यंत ती लागायला लागली आहे.
मुलगी आणि वडिलांच्या जोडीचा हा एक खूपच क्युट व्हिडीओ आहे. व्हिडीओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी नितारा आईसारखे दिसतं असल्याचं कमेंटमध्ये म्हटलं आहे.
काही महिन्यांपूर्वीच अक्षय आणि ट्विंकल खाना यांची नितारा १० वर्षांची झाली. या निमित्ताने अक्षयनं तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. नितारासोबतचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना अक्षयने लिहिले की, "माझा हात धरण्यापासून ते आता तिची शॉपिंग बॅग उचलण्यापर्यंत, माझी मुलगी खूप पटकन मोठी होत आहे. आज ती 10 वर्षांची झाली आहे... डॅडी तुझ्यावर प्रेम करतो." अशा शब्दांत अक्षयनं आपलं लेकी वरचं प्रेम व्यक्त केलं होतं.
अक्षय कुमार महेश मांजरेकर यांच्या आगामी मराठी सिनेमा 'वेडात मराठे वीर दौडले सात'(Vedat Marathe Veer Daudle Saat)ला घेऊन चर्चेत आहे. यात तो छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) भूमिका साकारणार आहे. २०२३ साली हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तीरेखेतील फोटो अक्षय कुमारने शेअर केला होता.