अक्षय कुमारने मुंबईत खरेदी केलं नवं आलिशान अपार्टमेंट! किंमत वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2022 13:04 IST2022-01-24T12:52:13+5:302022-01-24T13:04:44+5:30

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त कलाकारांपैकी एक आहे.

Akshay kumar bought new luxury apartment in mumbai know detail here | अक्षय कुमारने मुंबईत खरेदी केलं नवं आलिशान अपार्टमेंट! किंमत वाचून व्हाल थक्क

अक्षय कुमारने मुंबईत खरेदी केलं नवं आलिशान अपार्टमेंट! किंमत वाचून व्हाल थक्क

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) हा इंडस्ट्रीतील सर्वात व्यस्त कलाकारांपैकी एक आहे. तो अनेकदा त्याच्या चित्रपटांच्या टीझर, ट्रेलरमुळे चर्चेत असतो. बॅक टू बॅक चित्रपट देणारा अक्षय कुमार  (Akshay Kumar New Apartment)  त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. आता त्याच्याबद्दल आणखी काही बातम्या येत आहेत, ज्यानुसार बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने नवीन फ्लॅट खरेदी केला आहे. रिपोर्टनुसार,अक्षय कुमारने एक नवीन फ्लॅट खरेदी केला आहे, ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.

डिसेंबरमध्ये अक्षयने अंधेरी पश्चिममधले ऑफिस विकले होते, मात्र अद्याप त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. यापूर्वी डिसेंबरमध्ये अक्षय कुमारने त्याचे एक ऑफिस विकले होते. अक्षय कुमारने डिसेंबर २०२१ मध्ये अंधेरी पश्चिम येथील त्याचे ऑफिस ९ कोटींना विकले. त्यानंतर आता त्याने नवीन अपार्टमेंट घेतले आहे. 

कोईमोईच्या रिपोर्टनुसार, अक्षय कुमारने एक नवीन फ्लॅट घेतला आहे आणि या नवीन आलिशान फ्लॅटची किंमतही खूप जास्त आहे. रिपोर्टनुसार त्यांच्या या नवीन फ्लॅटची किंमत ७.८ कोटी आहे. त्याचा हा नवीन फ्लॅट खार पश्चिम येथील जॉय लिजेंड बिल्डिंगच्या 19व्या मजल्यावर असल्याचे बोलले जात आहे. यासोबतच त्याला येथे चार कार पार्किंगची जागाही मिळाली आहे. आता अक्षय कुमारचे चाहते त्याच्या या लक्झरी अपार्टमेंटचे फोटो पाहण्यासाठी उत्सुक झाले आहेत, मात्र दुसरीकडे याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती समोर आलेली नाही. 

अक्षय कुमारचा 'अतरंगी रे' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ज्यामध्ये तो सारा अली खान आणि साऊथ सुपरस्टार धनुषसोबत दिसला होता. याशिवाय त्याच्या आगामी चित्रपटांची यादीही खूप मोठी आहे. त्यात पृथ्वीराज, सेल्फी, ओएमजी 2, गोरखा, रक्षा बंधन, बच्चन पांडे, मिशन सिंड्रेला आणि राम सेतू या चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे.
--

Web Title: Akshay kumar bought new luxury apartment in mumbai know detail here