Akshay Kumar Birthday Special: अक्षय कुमारसोबत लग्न करण्यासाठी ट्विंकल खन्नाने ठेवली होती ही अट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 15:32 IST2019-09-09T15:31:32+5:302019-09-09T15:32:25+5:30
अक्षय कुमार आणि ट्वविंकल खन्ना यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. लग्न करण्याआधी ट्विंकलने अक्षयपुढे एक अट ठेवली होती.

Akshay Kumar Birthday Special: अक्षय कुमारसोबत लग्न करण्यासाठी ट्विंकल खन्नाने ठेवली होती ही अट
अक्षय कुमारचा आज वाढदिवस असून त्याचा जन्म पंजाबमधील आहे. त्याचे खरे नाव राजीव भाटिया असून त्याचे शिक्षण हे मुंबईत झाले आहे. त्याने चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी मॅरिटल आर्टचे शिक्षण घेतले असून त्याने वेटर म्हणून थायलंडमधील एका हॉटेलमध्ये नोकरी देखील केली आहे. तसेच त्याने कोलकातामधील एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम केले आहे. पण मुंबईत परतल्यावर त्याने मॉडलिंग करायला सुरुवात केली आणि मॉडलिंगमुळे केवळ दोन दिवसांत त्याला तो महिन्याला कमावत असलेल्या पगाराइतका पैसा मिळाला आणि त्याने मॉडलिंगमध्येच करियर करण्याचा विचार केला.
मॉडलिंग करत असताना त्याला चित्रपटांच्या ऑफर्स आल्या आणि सौगंध या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या करियरला सुरुवात केली. त्याच्या खिलाडी या चित्रपटाने त्याला स्टार बनवले. त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. त्याने आजवर रुस्तम, एअरलिफ्ट, रावडी राठोड, वेलकम, ओह माय गॉड, हेरा फेरी यांसारखे अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. त्याचा मिशन मंगल हा चित्रपट सध्या प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करत आहे.
अक्षयचे लग्न अभिनेत्री ट्विंकल खन्नासोबत झाले असून त्यांना आरव आणि नितारा अशी दोन मुले आहेत. त्यांची प्रेमकथा खूपच रंजक आहे. अक्षय आणि ट्विंकल यांची पहिली भेट फिल्मफेअर मासिकाच्या कव्हरपेजच्या फोटो शूटिंगसाठी झाली होती. या फोटोशूटनंतर अक्षयला ट्विंकल आवडायला लागली. त्यानंतर त्या दोघांनी इंटरनॅशनल खिलाडी या चित्रपटात काम केले. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्या दोघांचे अफेअर सुरू झाले आणि काहीच महिन्यात अक्षयने ट्विंकलला लग्नासाठी प्रपोज केले.
पण लग्न करण्याआधी ट्विंकलने त्याच्यापुढे एक अट ठेवली होती. ट्विंकलने त्याला सांगितले होते की, माझा लवकरच प्रदर्शित होणारा मेला हा चित्रपट फ्लॉप ठरला तरच मी तुझ्याशी लग्न करेन... हा चित्रपट फ्लॉप ठरला आणि त्या दोघांनी 7 जानेवाली 2001 मध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले. अक्षय आणि ट्विंकलचे लग्न अबू जानी आणि संदीप खोसला या प्रसिद्ध डिझायरांच्या घरी 50 लोकांच्या उपस्थितीत झाले होते.