खिलाडीची क्रेझ की वेडेपणा? अक्षय कुमारला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी; मॉलमध्ये चेंगराचेंगरीची स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 17:14 IST2026-04-11T17:13:11+5:302026-04-11T17:14:19+5:30

मॉलमध्ये आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी हजारो चाहते जमा झाले होते.

akshay kumar at noida mall for bhoot bangla promotions fans climb escalators | खिलाडीची क्रेझ की वेडेपणा? अक्षय कुमारला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी; मॉलमध्ये चेंगराचेंगरीची स्थिती

खिलाडीची क्रेझ की वेडेपणा? अक्षय कुमारला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी; मॉलमध्ये चेंगराचेंगरीची स्थिती

बॉलिवूडचा 'खिलाडी' अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'भूत बंगला' या हॉरर-कॉमेडी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार, राजपाल यादव आणि वामिका गब्बी ग्रेटर नोएडा येथील 'गौर सिटी मॉल'मध्ये पोहोचले होते. मात्र, अक्षयची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची इतकी  गर्दी झाली की, काही वेळातच मोठा गोंधळ उडाला.

मॉलमध्ये आपल्या लाडक्या अभिनेत्याला पाहण्यासाठी हजारो चाहते जमा झाले होते. गर्दी अनियंत्रित झाली आणि चाहत्यांनी  सुरक्षेसाठी लावलेले बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे तर, अक्षयची झलक पाहता यावी यासाठी अनेक तरुण मॉलच्या एस्केलेटरच्या रेलिंगवर चढले आणि तिथूनच आरडाओरडा करू लागले. यामुळे मॉलमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.


अक्षय कुमार म्हणाला, "मला या इंडस्ट्रीत सुमारे ३६ वर्ष झाली आहेत पण मी आजपर्यंत एका मॉलमध्ये एवढे लोक जमलेले पाहिले नाहीत."


सोशल मीडियावर या घटनेचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये लोक एकमेकांना धक्का देऊन पुढे सरकताना दिसत असून तिथे चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली होती. वरच्या मजल्यावरून खाली वाकून पाहणाऱ्या लोकांमुळे अपघाताची भीती व्यक्त केली जात होती. चाहत्यांच्या या वेडेपणामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांची मोठी तारांबळ उडाली.

प्रियदर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'भूत बंगला' या चित्रपटात तब्बू, परेश रावल आणि राजपाल यादव यांसारखी तगडी स्टारकास्ट आहे. १४ वर्षांनंतर अक्षय आणि प्रियदर्शन एकत्र येत असल्याने प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, नोएडा येथील या घटनेनंतर सोशल मीडियावर सुरक्षेच्या नियोजनाबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. चाहत्यांच्या या अलोट गर्दीवरून अक्षय कुमारची लोकप्रियता आजही किती अफाट आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

Web Title : अक्षय कुमार का क्रेज या पागलपन? मॉल में भीड़ से मची भगदड़

Web Summary : नोएडा के मॉल में अक्षय कुमार की फिल्म के प्रमोशन में भारी भीड़ उमड़ी। प्रशंसकों की भीड़ अनियंत्रित हो गई, बैरिकेड तोड़ दिए और एस्केलेटर पर चढ़ गए। इस घटना ने सुरक्षा संबंधी चिंताएं बढ़ा दीं, लेकिन कुमार की लोकप्रियता बरकरार रही।

Web Title : Akshay Kumar's Craze or Madness? Crowd Surge at Mall Causes Chaos

Web Summary : Akshay Kumar's movie promotion in Noida's mall faced a huge crowd. Barriers broke as fans surged, some risking safety on escalators. The event raised safety concerns, highlighting Kumar's enduring popularity despite the chaos.