Akshay Kumar : “भावा आता १०-२० वर्ष ब्रेक घे...”, नव्या सिनेमाची घोषणा करताच अक्षय कुमार ट्रोल 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 12:57 PM2023-03-22T12:57:53+5:302023-03-22T12:58:23+5:30

Akshay Kumar : होय, अक्षयने त्याच्या सोशल मीडियावरुन नव्या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. अक्षयने नव्या सिनेमाची घोषणा करताच त्याचे चाहते सुखावले. पण अनेकांनी मात्र त्याला ट्रोल करायला सुरूवात केली.

akshay kumar announce soorarai pottru remake release date netizens troll | Akshay Kumar : “भावा आता १०-२० वर्ष ब्रेक घे...”, नव्या सिनेमाची घोषणा करताच अक्षय कुमार ट्रोल 

Akshay Kumar : “भावा आता १०-२० वर्ष ब्रेक घे...”, नव्या सिनेमाची घोषणा करताच अक्षय कुमार ट्रोल 

googlenewsNext

गेल्या दीड वर्षात अक्षय कुमारने (Akshay Kumar ) एकही हिट दिलेला नाही. सूर्यवंशी हा त्याचा हिट झालेला अखेरचा सिनेमा. या सिनेमानं ३०० कोटींवर कमाई केली होती. मात्र यानंतर आलेले त्याचे सर्व सिनेम दणकून आपटले. सम्राट पृथ्वीराज, बच्चन पांडे, रक्षाबंधन, रामसेतू सगळेच्या सगळे एकापाठोपाठ एक फ्लॉप गेलेत. अक्कीच्या बॅक टू बॅक फ्लॉप सिनेमांमुळे  कटपुतली या सिनेमाच्या मेकर्सनी इतका धसका घेतला की, हा सिनेमा त्यांनी ओटीटीवर रिलीज केला.  गेल्याच महिन्यात प्रदर्शित झालेला अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ हा चित्रपटही सपशेल फेल ठरला. पण तरिही अक्षयनं हार मानलेली नाही. आता तो एक नवा सिनेमा घेऊन येतोय.

होय, अक्षयने त्याच्या सोशल मीडियावरुन नव्या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. Soorarai Pottru या तामिळ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अक्षय झळकणार आहे. या हिंदी रिमेकचं नाव अद्याप ठरलेलं नाही. पण रिलीज डेट मात्र ठरलीये. १ सप्टेंबर २०२३ रोजी हा सिनेमा रिलीज होतोय. अक्षयने नव्या सिनेमाची घोषणा करताच त्याचे चाहते सुखावले. पण अनेकांनी मात्र त्याला जबरदस्त ट्रोल करायला सुरूवात केली. अनेकांनी अक्षयला ब्रेक घेण्याचा सल्ला दिला. काहींनी रिमेकवरून त्याला फैलावर घेतलं.

चाहत्यांच्या कमेंट्स....
अक्षयने Soorarai Pottruच्या रिमेकची घोषणा करताच, सोशल मीडिया युजर्स खवळले. “अरे भावा, एक दोन वर्ष दे आणि एखादा चांगला सिनेमा बनव, लोक थकलेत आता तुला पाहून” अशी कमेंट एकाने केली आहे.   “अजून किती रिमेक करणार आहेस, फक्त रिमेकच करणार का”, अशा शब्दांत एकाने संताप व्यक्त केला.  “भावा एक काम कर, १०-२० वर्ष ब्रेक घे”, असा सल्ला एका युजरने त्याला दिला. काहींनी त्याची रिमेक किंग म्हणून खिल्ली उडवली.
अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर येत्या काळात अक्षयचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. बडे मियां छोटे मियां या सिनेमात तो आहे. ओह माय गॉड २ आणि हेराफेरी ३ मध्येही तो दिसणार आहे. याशिवाय एक बायोपिकही त्याने साईन केला आहे. 

Web Title: akshay kumar announce soorarai pottru remake release date netizens troll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.