अक्षय, टायगरच्या बहुचर्चित 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 13:41 IST2024-03-26T13:38:25+5:302024-03-26T13:41:02+5:30

'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या पहिल्याच झलकने प्रेक्षकांना वेड लावलं आहे.

Akshay Kumar And Tiger Shroff Starrer Bade Miyan Chote Miyan Trailer out | अक्षय, टायगरच्या बहुचर्चित 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

अक्षय, टायगरच्या बहुचर्चित 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर पाहिलात का?

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटाचा टीझर आणि गाणी रिलीज झाल्यापासून या चित्रपटाविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. अखेर आता प्रतीक्षा संपली आहे. प्रेक्षकांचा उत्साह पाहता सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आज रिलीज करण्यात आला आहे. यामध्ये अक्षय-टायगर जबरदस्त ॲक्शन करताना दिसत आहेत.

अली अब्बास जफर दिग्दर्शित 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाच्या पहिल्याच झलकने प्रेक्षकांना वेड लावलं आहे. ट्रेलरमधून अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ दोघेही आपला जीव धोक्यात घालून देश वाचवण्यासाठी लढताना दिसून येत आहेत. या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ आणि मानुषी छिल्लरशिवाय पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलं आहे. वासू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर हे सिनेमाचे निर्माते आहेत.  येत्या 10 एप्रिल 2024 रोजी ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. अक्षय कुमारच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो शेवटचा 'मिशन रानीगंज'मध्ये दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाई करू शकला नव्हता.
 

Web Title: Akshay Kumar And Tiger Shroff Starrer Bade Miyan Chote Miyan Trailer out