नाना पाटेकरांचा 'तो' प्रश्न आणि अजित पवार लाजले, जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2026 16:14 IST2026-02-04T16:09:17+5:302026-02-04T16:14:11+5:30

अजित पवारांची कलाकारांशीही चांगली मैत्री होती. त्यापैकीच एक म्हणजे नाना पाटेकर.

Ajit Pawar Nana Patekar Viral Video Old Memories Death Plane Crash News Social Media | नाना पाटेकरांचा 'तो' प्रश्न आणि अजित पवार लाजले, जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल

नाना पाटेकरांचा 'तो' प्रश्न आणि अजित पवार लाजले, जुना व्हिडीओ पुन्हा व्हायरल

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी आजवर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे योगदान दिले आहे. अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला जात आहे. अशातच २०१६ सालचा एक अतिशय दुर्मिळ आणि मिश्किल व्हिडीओ पुन्हा एकदा तुफान व्हायरल होत आहे. 

अनेकदा जाहीर व्यासपीठावर अभिनेते नाना पाटेकर आणि अजित पवार एकत्र दिसले आहेत. नानांनी अनेकदा अजित पवारांच्या मिश्किल स्वभावाचं कौतुक करुन त्यांचीही फिरकीही घेतली आहे. अशाच एका सार्वजनिक कार्यक्रमात नाना पाटेकर मंचावर भाषण करत होते आणि त्यांच्या शेजारी बसलेले अजित पवार हे आपल्याच काहीतरी विचारात मग्न होते. यावेळी नाना पाटेकरांच्या तीक्ष्ण नजरेतून हे सुटले नाही आणि त्यांनी अजित पवारांना उद्देशून म्हटलं,  "अजित, तुझं लक्ष दुसरीकडे आहे. मी फार महत्त्वाचं बोलतोय. कोण आहे मनामध्ये या क्षणाला, खरं सांग? असा अगदी हरवल्यासारखा का झालास? काही तरी गोंधळ आहे".


नानांच्या या प्रश्नावर नेहमी कडक शिस्तीत दिसणारे अजित पवार हे लाजल्याचे दिसले. नाना पाटेकर तिथेच थांबले नाहीत, ते पुढे म्हणाले, "अजितच्या गालावर लाली मी पहिल्यांदाच पाहिली. छान! तू लाजलेलाही मला खूप आवडतोस". हे ऐकून संपूर्ण सभागृहात हशा पिकला होता. अजित पवार आणि नाना पाटेकर हे दोन भिन्न क्षेत्रातील व्यक्ती असले, तरी त्यांच्या स्वभावात कमालीचा स्पष्टवक्तेपणा आणि कामाची शिस्त हा समान धागा होता. नानांना दादांच्या कामाचा वेग आवडायचा, तर दादांना नानांचे समाजकार्य आणि साधेपणा भावयाचा. 

Web Title : नाना पाटेकर के सवाल पर अजित पवार शरमाए; पुराना वीडियो वायरल।

Web Summary : नाना पाटेकर द्वारा एक सार्वजनिक कार्यक्रम में अजित पवार को छेड़ने का एक पुराना वीडियो फिर से सामने आया है। पाटेकर ने देखा कि पवार विचारों में खोए हुए हैं और मजाक में पूछा कि उनके दिमाग में कौन है, जिससे पवार शरमा गए। विभिन्न क्षेत्रों से होने के बावजूद, उनकी दोस्ती आपसी सम्मान से चिह्नित थी।

Web Title : Nana Patekar's question makes Ajit Pawar blush; old video goes viral.

Web Summary : An old video of Nana Patekar teasing Ajit Pawar during a public event has resurfaced. Patekar noticed Pawar was lost in thought and jokingly asked who was on his mind, causing Pawar to blush. Their camaraderie, despite being from different fields, was marked by mutual respect.