"आर्यन खानला मी जेलमध्ये सिगरेट दिली"; बॉलिवूड अभिनेत्याचा दावा; म्हणाला- "तुरुंगात तो..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 09:24 IST2025-03-20T09:24:25+5:302025-03-20T09:24:59+5:30
बिग बॉस अभिनेता एजाज खानने तुरुंगात असताना आर्यन खानची अवस्था कशी होती, याविषयी खळबळजनक खुलासा केला (ajaz khan, aryan khan)

"आर्यन खानला मी जेलमध्ये सिगरेट दिली"; बॉलिवूड अभिनेत्याचा दावा; म्हणाला- "तुरुंगात तो..."
शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खानला (aryan khan) अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली आर्यनला अटक करण्यात आली होती. त्यानंतर मुंबईतील आर्थर रोड कारागृहात आर्यनची रवानगी करण्यात आली होती. जेलमध्ये असताना आर्यनला एका बॉलिवूड अभिनेत्याने मदत केली होती. इतकंच नव्हे या अभिनेत्याने आर्यनला सिगरेट पुरवली होती. हा बॉलिवूड अभिनेता म्हणजे एजाज खान. एजाजने (ajaz khan) केलेल्या दाव्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आर्यनला एजाजने कशी मदत केली?
एका मुलाखतीत बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये झळकलेला अभिनेता एजाज खानने हा खुलासा केला. आर्यन ज्या काळात जेलमध्ये होता त्याच दरम्यान एजाज सुद्धा आर्थर रोड तुरुंगात होता. एजाज म्हणाला की, "जेलमध्ये असलेल्या ३००० कैद्यांमध्ये आर्यन सुरक्षित नव्हता. मी त्याची मदत केली. आर्यनला मी पाणी आणि सिगरेट पुरवली. तुरुंगात तुम्ही कोणासाठी याशिवाय अधिक काही करु शकत नाही. याशिवाय आर्यनला मी तुरुंगातील गुंड, माफिया लोकांपासून वाचवलं. आर्यनला सामान्य तुरुंगात डांबून ठेवलं होतं. त्यामुळे त्याच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती."
शिल्पा शेट्टीच्या नवऱ्याचीही केली मदत
एजाज खानने मुलाखतीत असंही सांगितलं की, शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रालाही त्याने तुरुंगात असताना मदत केली होती. एजाज म्हणाला की, "राज कुंद्रा जेलमध्ये असताना तो माझ्याजवळ पाणी, ब्रेड, बिस्किट मागायचा. तुम्हाला नॉर्मल पाणी मिळेल, बिसलेरी मिळणार नाही, असं जेलमधील सुपरिटेंडेंटने सांगितलं होतं. आता नॉर्मल पाणी जर त्यांनी प्यायलं असतं तर ते आजारी पडले असते. म्हणून मी त्यांना मदत केली."