Drishyam 2 OTT Release: थिएटरमध्ये धुमाकूळ घालणारा ‘दृश्यम 2’ ओटीटीवर येणार; जाणून घ्या, कधी? कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 15:44 IST2022-11-21T15:41:44+5:302022-11-21T15:44:58+5:30
Drishyam 2 OTT Release: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे...

Drishyam 2 OTT Release: थिएटरमध्ये धुमाकूळ घालणारा ‘दृश्यम 2’ ओटीटीवर येणार; जाणून घ्या, कधी? कुठे?
Drishyam 2 OTT Release: अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ (Drishyam 2 ) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर नुसता धुमाकूळ घातला आहे. तीनच दिवसांत या सिनेमाने 60 कोटींचा आकडा पार केला आहे. अनेक ठिकाणी चित्रपटाचे शो हाऊसफुल्ल सुरू आहेत. अशात अजय देवगण (Ajay Devgn), तब्बू, अक्षय खन्ना, श्रिया सरनच्या अभिनयानं सजलेला हा सिनेमा ओटीटीवर येणार म्हटल्यावर चाहत्यांमध्ये नवी उत्सुकता पाहायला मिळतेय.
लवकरच ‘दृश्यम 2’ ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. अर्थात यासाठी प्रेक्षकांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. होय, थिएटर रिलीज आणि ओटीटी प्रीमिअर यांच्यात कमीत कमी 6 आठवड्यांचं अंतर असेल. या हिशेबाने डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा मग जानेवारीच्या सुरूवातीला हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होईल. ओटीटीवर कुठे? तर ताज्या बातमीनुसार, ‘दृश्यम 2’चे डिजिटल राईट्स अॅमेझॉन प्राईमने व्हिडीओने खरेदी केले आहेत. त्यामुळे अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर तुम्ही घरी बसून या चित्रपटाचा आनंद घेऊ शकाल.
‘दृश्यम 2’ हा सिनेमा अभिषेक पाठक यांनी दिग्दर्शित केला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 15.38 कोटींची कमाई केली. शनिवारी 21.59 कोटी व काल रविवारी तिसऱ्या दिवशी या सिनेमाने 27.17 कोटींचा गल्ला जमवला. एकूण तीनदिवसांत या चित्रपटाने 64.17 कोटींची कमाई केली आहे.
अशी आहे कथा
विजय साळगावकर आणि त्याच्या कुटुंबाची हि कथा आहे. 4 ऑक्टोबर 2014 च्या रात्री घडलेल्या घटनेतील दुसरा ट्रॅक ओपन करत चित्रपटात रंगत आणली आहे. केबल चालवणाऱ्या विजयनं प्रगती केली आहे. घरासमोरील जमिन विकून थिएटर उभारलं आहे. तो चित्रपटाची निर्मितीही करत आहे. त्याची कथा त्यानं पुस्तक रूपात प्रकाशित केली आहे. सॅमची बॉडी न मिळाल्यानं पोलिसांचं शोधकार्य सुरूच आहे. पोलीस कधीही पुन्हा येऊ शकतात हे माहित असल्यानं विजयही गाफील नाही. विजयच्या घरासमोर राहणाऱ्या जेनीला तिचा दारुडा नवरा बेदम मारहाण करत असतो. जेनीला नवऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार करायला विजय सांगतो आणि दुसऱ्या भागात पहिल्यांदा त्याची पोलिसांशी गाठ पडते. त्यानंतर जे घडतं ते पाहण्याजोगं आहे.