थिएटरमध्ये फ्लॉप झालेला अजय देवगण-तब्बूचा 'औरो में कहा दम था' OTT वर रिलीज! या ठिकाणी पाहता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 11:11 IST2024-09-27T11:10:51+5:302024-09-27T11:11:16+5:30

अजय देवगण-तब्बूची भूमिका असलेला 'औरो में कहा दम था' सिनेमा या ओटीटीवर आता घरबसल्या पाहू शकता

Ajay Devgn Tabu movie Auron Mein Kaha Dum Tha ott release details | थिएटरमध्ये फ्लॉप झालेला अजय देवगण-तब्बूचा 'औरो में कहा दम था' OTT वर रिलीज! या ठिकाणी पाहता येणार

थिएटरमध्ये फ्लॉप झालेला अजय देवगण-तब्बूचा 'औरो में कहा दम था' OTT वर रिलीज! या ठिकाणी पाहता येणार

अजय देवगण - तब्बू या जोडीचं स्वतःचं एक फॅन फॉलोईंग आहे. या दोघांनी 'दृश्यम', 'दृश्यम २' असे अनेक सिनेमे थिएटरमध्ये गाजवले आहेत. या दोघांची पडद्यावरील ऑन स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांमध्ये चर्चेत राहिली. अशातच अजय देवगण-तब्बू यांचा एक महत्वाकांक्षी सिनेमा यावर्षी रिलीज झाला. त्या सिनेमाचं नाव म्हणजे 'औरो में कहा दम था'. हा सिनेमा थिएटरमध्ये इतका चालला नाही. पण आता प्रेक्षकांना हा सिनेमा घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे. 

या ठिकाणी पाहू शकता 'औरो में कहा दम था' 

२ ऑगस्टला 'औरो में कहा दम था' हा सिनेमा रिलीज झाला. प्रेमकथा असल्याने रिलीजआधी या सिनेमाची खूप चर्चा होती. पण सिनेमा थिएटरमध्ये मात्र सपशेल आपटला. 'औरो में कहा दम था'  आता ओटीटीवर रिलीज झालाय. प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने सिनेमाची ओटीटी रिलीजची घोषणा केलीय. आज २७ सप्टेंबरपासून तुम्ही घरबसल्या 'औरो में कहा दम था'चा आनंद घेऊ शकता. 


'औरो में कहा दम था' सिनेमाविषयी

नीरज पांडे दिग्दर्शित 'औरो में कहा दम था' सिनेमा याचवर्षी २ ऑगस्टला थिएटरमध्ये रिलीज झालेला. याआधी 'औरो में कहा दम था' सिनेमा ५ जुलैला रिलीज होणार होता. परंतु दोन दिवसांवर रिलीज असताना सिनेमाचं प्रदर्शन थांबवण्यात आलंय. आणि सिनेमा २ ऑगस्टला रिलीज करण्यात आला. दृश्यमनंतर अजय देवगण-तब्बूचा हा सिनेमा कशी जादू करणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. परंतु हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

Web Title: Ajay Devgn Tabu movie Auron Mein Kaha Dum Tha ott release details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.