'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 13:24 IST2025-07-20T13:23:34+5:302025-07-20T13:24:13+5:30
'सन ऑफ सरदार २'ची नवी रिलीज डेट समोर, 'या' सिनेमाशी भिडणार अजय देवगण

'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
अजय देवगणचा (Ajay Devgn) आगामी 'सन ऑफ सरदार २' (Son Of Sardar 2) २५ जुलै रोजी रिलीज होणार होता. लोकांना सिनेमाचा ट्रेलर खूप आवडला. अजय आणि मृणाल ठाकूरची केमिस्ट्रीही खूप व्हायरल होत आहे. मात्र आता सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे. रिलीजच्या एक आठवडा आधीच मेकर्सने हा निर्णय घेतला आहे. यामागचं नक्की कारण काय आणि सिनेमाची नवी रिलीड डेट कोणती? वाचा
'सन ऑफ सरदार' सिनेमाचा सीक्वेल 'सन ऑफ सरदार २'ची काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. २५ जुलै रोजी सिनेमा थिएटरमध्ये येणार होता. त्या दिवशी इतर कोणता सिनेमाही नव्हता. सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूरचा 'परम सुंदरी' रिलीज होणार होता मात्र तो 'सन ऑफ सरदार'साठीच पुढे ढकलण्यात आला होता. मग आता मेकर्सवर सिनेमा पुढे ढकलण्याची वेळ का आली? याचं कारण 'सैय्यारा' सिनेमा असल्याची चर्चा आहे. अहान पांडे आणि अनीत पड्डा या नव्या स्टार्सने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय. मोहित सुरी दिग्दर्शित 'सैय्यारा' पाहून प्रेक्षक थिएटरमध्ये अक्षरश: गर्दी करत आहेत. नवोदित कलाकारांची ही लव्हस्टोरी तुफान हिट झालीये. १८ जुलै रोजी 'सैय्यारा' रिलीज झाला आणि हा सिनेमा आणखी काही आठवडे धुमाकूळ घालेल असंच चित्र दिसतंय. 'सैय्यारा'चा जबरदस्त परफॉर्मन्स पाहून 'सन ऑफ सरदार २'च्या मेकर्सने रिलीज पुढे ढकलल्याची चर्चा आहे.
कधी रिलीज होणार 'सन ऑफ सरदार २'?
'सन ऑफ सरदार २'चा आणखी एक ट्रेलर आज प्रदर्शित होणार आहे. तसंच कलाकार आणखी जोरात प्रमोशन करणार आहेत. २८ जुलै रोजी सिनेमासाठी अॅडव्हान्स बुकिंग सुरु होणार असून १ ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज केला जाणार आहे. त्याच दिवशी सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरीचा 'धडक २'ही रिलीज होणार आहे. त्यामुळे 'सन ऑफ सरदार २' आणि 'धडक २'चा क्लॅश होणार आहे.
'सैय्यारा'ची कमाई
'सैय्यारा'ने पहिल्याच दिवशी २० कोटींची कमाई करत रेकॉर्ड सेट केला. तर दुसऱ्या दिवशी २४ कोटींचा बिझनेस केला. आज रविवारची कमाई आणखी जास्त होण्याचाही अंदाज आहे. बॉक्सऑफिसवर 'सैय्यारा'ची जादू पसरली आहे.