Video: 'अजय देवगणचीच कॉपी', Shaitaan च्या स्क्रीनिंगला छोट्या युगने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 09:31 AM2024-03-08T09:31:11+5:302024-03-08T09:32:01+5:30

अजय देवगणचा लेकासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Ajay Devgn son Yug Devgn attended screening of Shaitaan netizens says copy of Ajay | Video: 'अजय देवगणचीच कॉपी', Shaitaan च्या स्क्रीनिंगला छोट्या युगने वेधलं लक्ष

Video: 'अजय देवगणचीच कॉपी', Shaitaan च्या स्क्रीनिंगला छोट्या युगने वेधलं लक्ष

अजय देवगण (Ajay Devgn) आणि आर माधवन (R Madhavan)यांचा 'शैतान' आज रिलीज झाला आहे. कालच मुंबईत सिनेमाचा प्रीमिअर पार झाला. यावेळी अजय देवगण त्याचा मुलगा युगला (Yug Devgn) घेऊन आला होता. युग अगदी हुबेहूब वडिलांवरच गेला आहे अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत. अजय देवगणचा लेकासोबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. बापलेकाचा हा व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पडला आहे. 

'शैतान' हा साऊथ सिनेमाचा सीक्वेल आहे. अजय देवगण आणि आर माधवन पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत. आर माधवन सिनेमात शैतान आहे. सिनेमाचा ट्रेलर अंगावर काटा आणणारा होता. चाहत्यांमध्ये चित्रपट पाहण्याची आतुरता होती. काल पार पडलेल्या स्क्रीनिंगला सर्व कलाकारांनी हजेरी लावली. यावेळी अजय देवगणचा मुलगा युगने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. युग अगदी त्याच्या वडिलांसारखाच दिसायला लागला आहे. त्याच्या चेहऱ्यावरचं हसूही अजयसारखंच आहे. अजय त्याला काहीतरी म्हणतो तेव्हा युग च्या चेहऱ्यावरचे हावभाव खूपच क्युट आहेत. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीच्या पेजवर व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे.

व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या 'हा तर वडिलांचीच कॉपी दिसतोय' 'लहानपणीचा अजय देवगण' अशा कमेंट्स आल्या आहेत. तर काही जणांना तो काजोलसारखाही भासत आहे. 'शैतान' सिनेमात अजय देवगण, आर माधवन यांच्याशिवाय साऊथ अभिनेत्री ज्योतिका, जानकी बोडिवाला यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: Ajay Devgn son Yug Devgn attended screening of Shaitaan netizens says copy of Ajay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.