अखेर ठरलं! अजय देवगण-रितेश देशमुखच्या 'RAID 2'ला तारीख मिळाली; 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 15:07 IST2025-03-24T15:07:12+5:302025-03-24T15:07:44+5:30
'Raid' सिनेमानंतर आता 'Raid 2'साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमाची रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आता 'RAID 2'ला मुहुर्त मिळाला असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अखेर ठरलं! अजय देवगण-रितेश देशमुखच्या 'RAID 2'ला तारीख मिळाली; 'या' दिवशी प्रदर्शित होणार सिनेमा
सुपरस्टार अजय देवगण त्याच्या दमदार अभिनयामुळे आणि हिट चित्रपटांमुळे ओळखला जातो. अजय देवगणच्या 'Raid 2' सिनेमाची चाहते गेल्या कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाबद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे. २०१८ साली प्रदर्शित झालेल्या 'Raid' या सिनेमाचा हा सीक्वल असणार आहे. ज्यामध्ये अजय देवगण आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसला होता. 'Raid' सिनेमानंतर आता 'Raid 2'साठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमाची रिलीज डेट अनेकदा पुढे ढकलण्यात आली होती. अखेर आता 'RAID 2'ला मुहुर्त मिळाला असून लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अजय देवगण मुख्य भूमिकेत असलेला 'Raid 2' सिनेमा आधी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता. पण, रोहित शेट्टी दिग्दर्शित अजयच्याच 'सिंघम अगेन' या चित्रपटाच्या कामाला उशीर झाल्यानंतर 'Raid 2' च्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल करण्यात आला होता. त्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये सिनेमा रिलीज करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र त्यानंतर पुन्हा रिलीज डेट बदलण्यात आली. आता 'Raid 2'ची नवी रिलीज डेट जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, हा सिनेमा आता १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
'Raid 2' मध्ये अजय देवगण पुन्हा एकदा आयकर विभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात रितेश देशमुख खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राज गुप्ता यांनी केलं आहे. या सिनेमात अजय देवगण आणि रितेश देशमुखसह वाणी कपूरही दिसणार आहे.