'धुरंधर' सोबत होणारी स्पर्धा टाळण्यासाठी 'धमाल-४' ची तारीख बदलली? आता 'या' दिवशी होणार रिलीज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 17:03 IST2026-01-18T16:50:19+5:302026-01-18T17:03:16+5:30

ठरलं!'या' दिवशी प्रदर्शित होणार अजय देवगणचा 'धमाल-४', कधी अन् कुठे पाहाल?

ajay devgn riteish deshmukh and arshad warsi starrer dhamaal 4 movie released date out | 'धुरंधर' सोबत होणारी स्पर्धा टाळण्यासाठी 'धमाल-४' ची तारीख बदलली? आता 'या' दिवशी होणार रिलीज 

'धुरंधर' सोबत होणारी स्पर्धा टाळण्यासाठी 'धमाल-४' ची तारीख बदलली? आता 'या' दिवशी होणार रिलीज 

Dhamaal 4 Movie: बॉलिवूडमधील 'धमाल' या कॉमेडी फ्रॅंचायजीचा चाहतावर्ग कमालीचा मोठा आहे.  पहिल्या तीन भागांच्या यशानंतर आता धमालचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी आणि जावेद जाफरी हे कलाकार या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवायला सज्ज झाले आहेत.गेल्या काही वर्षांपासून या सिनेमाबाबत चर्चा सुरू होत्या, अशातच आता निर्मात्यांनी धमाल-४ चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक आहेत.


नुकतीच टी-सीरीजने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नवीन पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलंय की, धमाल टाइम्स ब्रेकिंग न्यूज... 'धमाल ४' १२ जून, २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 
अब धमाल बोला है तो करना ही पड़ेगा. जुड़े रहें!या चित्रपटाच दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केलं आहे. 

दरम्यान, धमाल-४ हा चित्रपट सुरुवातीला २०२६ च्या ईदला प्रदर्शित होणार होता. मात्र, रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' आणि यशच्या 'टॉक्सिक' या चित्रपटांशी होणारी स्पर्धा टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा चित्रपटाची नवीन तारीख समोर आली आहे. या चित्रपटात अजय देवगण, रितेश देशमुख, अर्शद वारसी, संजय मिश्रा आणि जावेद जाफरी यांच्यासह ईशा गुप्ता, संजीदा शेख, अंजली आनंद, उपेंद्र लिमये, विजय पाटकर आणि रवी किशन यांच्याही भूमिका आहेत.

Web Title : क्या 'धुरंधर' से टकराव से बचने के लिए 'धमाल 4' की तारीख बदली गई?

Web Summary : 'धमाल 4' की रिलीज डेट 12 जून, 2026 कर दी गई है, कथित तौर पर अन्य बड़ी फिल्मों के साथ प्रतिस्पर्धा से बचने के लिए। फिल्म में अजय देवगन, रितेश देशमुख, अरशद वारसी और जावेद जाफरी हैं, और इसका निर्देशन इंद्र कुमार ने किया है। फिल्म की कास्ट में ईशा गुप्ता, संजीदा शेख और अन्य शामिल हैं।

Web Title : 'Dhamaal 4' release date changed to avoid clash with 'Dhurandhar'?

Web Summary : The release date for 'Dhamaal 4' has been moved to June 12, 2026, reportedly to avoid competition with other big films. The movie stars Ajay Devgn, Ritesh Deshmukh, Arshad Warsi, and Javed Jaffrey, and is directed by Indra Kumar. The film's cast includes Isha Gupta, Sanjeeda Sheikh and others.