अजय देवगणचा 'मैदान' पाहा फक्त ९९ रुपयांत! कधी, कुठे आणि कसं? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 15:55 IST2024-04-10T15:54:12+5:302024-04-10T15:55:25+5:30
अजय देवगणच्या 'मैदान'साठी खास ऑफर! फक्त ९९ रुपयांत पाहता येणार सिनेमा

अजय देवगणचा 'मैदान' पाहा फक्त ९९ रुपयांत! कधी, कुठे आणि कसं? जाणून घ्या
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण त्याच्या 'मैदान' या सिनेमामुळे चर्चेत आहे. ईदच्या मुहुर्तावर 'मैदान' सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. या सिनेमातून इंडियन फुटबॉलसाठी आयुष्य देणाऱ्या सय्यद रहीम यांची कहाणी मोठ्या पडद्यावर मांडण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या सिनेमाची प्रेक्षक वाट बघत होते. आता प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी अजय देवगणचा 'मैदान' सिनेमा फक्त ९९ रुपयात पाहता येणार आहे. कधी, कुठे आणि कसं? याबाबत जाणून घेऊया.
गेली कित्येक वर्ष रखडलेल्या 'मैदान' सिनेमाला अखेर मुहुर्त मिळाला आहे. अनेकदा रिलीज डेट पुढे ढकलल्यानंतर अखेर अजय देवगणचा मैदान सिनेमा गुरुवारी (११ एप्रिल) प्रदर्शित केला जाणार आहे. या सिनेमासाठी एक भन्नाट ऑफर देण्यात आली आहे. मुक्ता A2 सिनेमाकडून अजय देवगणाच्या 'मैदान' सिनेमाचं तिकीट केवळ ९९ रुपयांमध्ये मिळणार आहे. मुक्ता A2 सिनेमाच्या ऑफिशियल पेजवरुन याबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 'मैदान' सिनेमा ९९ रुपयांत पाहण्यासाठी तुम्हाला जवळच्या मुक्ता A2 सिनेमा हॉलमध्ये तिकीट बुक करावं लागणार आहे.
'मैदान' सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. यामध्ये त्याने इंडियन फुटबॉल कोच सय्यद रहीम यांची भूमिका साकारली आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अमित शर्मा यांनी केलं आहे. तर बोनी कपूर यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमात अजय देवगणबरोबर रुद्रनील घोष, प्रियामणि या कलाकारांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.