ऐश्वर्या रायची डुप्लीकेट! 'लकी गर्ल' अभिनेत्री स्नेहा उल्लालने मिनी स्कर्टमध्ये दाखवल्या अदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 10:43 IST2026-02-12T10:42:46+5:302026-02-12T10:43:29+5:30
स्नेहा आज स्क्रीनवर दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते.

ऐश्वर्या रायची डुप्लीकेट! 'लकी गर्ल' अभिनेत्री स्नेहा उल्लालने मिनी स्कर्टमध्ये दाखवल्या अदा
ऐश्वर्या रायची ड्युप्लीकेट म्हणून सिनेइंडस्ट्रीत आलेली 'लकी गर्ल' स्नेहा उल्लाल आठवतेय? सलमान खानने तिला सिनेसृष्टीत आणलं होतं. स्नेहाचे डोळे, चेहरा अगदी ऐश्वर्यासारखाच होता हे पाहून प्रेक्षकही तेव्हा चकित झाले होते. काही सिनेमे केल्यानंतर स्नेहा इंडस्ट्रीतून एकाएकी गायबच झाली. आता तिचा मिनी स्कर्टमधला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. तिच्या सौंदर्याची आजही स्तुती होत आहे.
स्नेहा उल्लाल ३८ वर्षांची आहे. स्नेहा आज स्क्रीनवर दिसत नसली तरी ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आजही तिला लकी गर्ल म्हणूनच ओळखलं जातं. 'लकी: नो टाइम फॉर लव्ह' सिनेमातून तिने पदार्पण केलं होतं. २००५ साली हा सिनेमा आला होता. ऐश्वर्यासारखी दिसते म्हणून ती खूप चर्चेत आली होती. आता तिचा मिनी स्कर्ट लूक व्हायरल होतोय. या लूकमधून तिने चाहत्यांना प्रभावित केलं आहे. स्नेहा आजही परफेक्ट फॅशन गोल देत आहे.
स्नेहाचा मिनी स्कर्ट लूक सॉफ्ट गर्ली व्हाईब आणि व्हेकेशन रेडी स्टाईल यांचा परेफक्ट मिक्स आहे. फॅशनेबल पण तितकाच कम्फर्ट असणारा असा तिचा लूक आहे. तिने समरल फ्रेंडली लाइट वेट फॅब्रिक व्हाईट स्कर्ट टॉप घातला आहे. यावर गुलाबी रंगाचं नक्षीकाम आहे ज्यामुळे तिचा लूक आणखी खुलून येत आहे. हा शीअर फॅब्रिकने बनलेला टॉप आहे ज्यावर धाग्यांचं नक्षीराम आहे. यासोबत तिने ओव्हरसाईज पीटर पॅन डिझाईन लूक ड्रामा अॅड केला आहे.
स्नेहाचे इन्स्टाग्रामवर १ मिलियन फॉलोअर्स आहेत. 'लकी' सिनेमाशिवाय स्नेहाने 'आर्यन', 'जाने भी दो यारो', 'काश मेरे होते', 'क्लिक', 'बेजुबान इश्क' या सिनेमांमध्येही काम केलं. ती शेवटची 'साको ३६३' सिनेमात दिसली.