कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 08:58 IST2025-05-22T08:57:37+5:302025-05-22T08:58:17+5:30
Aishwarya Rai at Cannes 2025: ऐश्वर्या राय बच्चनने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये दिमाखात एन्ट्री केली आहे. ऐश्वर्याचे फोटो पाहून चाहत्यांनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे

कान्सची राणी! कपाळी कुंकू अन् पांढरी साडी परिधान करत ऐश्वर्या रायने दाखवलं भारतीय संस्कृतीचं दर्शन
सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हलची चांगलीच चर्चा आहे. या फेस्टिव्हलमध्ये हॉलिवूडसह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वांना एका अभिनेत्रीच्या येण्याची खूप उत्सुकता होती ती अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या राय बच्चन. ऐश्वर्या (aishwarya rai bachchan) दरवर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलला हजेरी लावताना दिसते. यंदा ऐश्वर्या काहीशी उशीरा या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली पण तिने सर्वांचं मन जिंकलं.
ऐश्वर्याची कान्समध्ये लक्षवेधी एन्ट्री
कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मध्ये अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने पारंपरिक भारतीय लुक परिधान केला. तिने मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली बनारसी साडी परिधान केली होती. या साडीला सोनेरी आणि चंदेरी रंगाचा पदर दिसून आला. याशिवाय ऐश्वर्याने ५०० कॅरेटचे डायमंडचे दागिने परिधान केले होते. ऐश्वर्या या लूकमध्ये खूप सुंदर दिसत आहे. ऐश्वर्याने भांगेत कुंकू भरलं आहे. यामुळे ऐश्वर्याने 'ऑपरेशन सिंदूर'विषयी आदर प्रकट केला आहे, अशी चर्चा आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या-अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांवर ऐश्वर्याने हे कुंकू भरुन पूर्णविराम दिला आहे. सर्वांना हात जोडून "नमस्कार" करत ऐश्वर्याने मन जिंकलंय.
ऐश्वर्याने केलेल्या या लूकमुळे तिने भारतीय परंपरेचं दर्शन जागतिक स्तरावर केलं आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यावेळी ऐश्वर्याची मुलगी आराध्याही आईसोबत उपस्थित असलेली दिसली. ऐश्वर्याचा हा लूक पाहून तिचे चाहते तिला खऱ्या अर्थाने 'कान्सची राणी' असं म्हणत आहेत. ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास झळकत आहे. २००२ मध्ये ऐश्वर्या पहिल्यांदा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. देवदास सिनेमाच्या प्रिमिअरनिमित्त ऐश्वर्या गेली होती. त्यानंतर २०२५ निमित्ताने सलग २३ वेळा ऐश्वर्या कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावताना दिसली