तब्बल ११ वर्षांनंतर अहानचं झालं ब्रेकअप, शाळेत तानिया श्रॉफच्या प्रेमात पडला होता सुनील शेट्टीचा मुलगा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 16:50 IST2023-12-23T16:50:16+5:302023-12-23T16:50:41+5:30
अभिनेता सुनील शेट्टी(Suniel Shetty)चा मुलगा आणि अभिनेता अहान शेट्टी (Ahan Shetty) सध्या चर्चेत आहे. अहानचे ११ वर्षे जुने नाते तुटल्याचे वृत्त समोर आले आहे.

तब्बल ११ वर्षांनंतर अहानचं झालं ब्रेकअप, शाळेत तानिया श्रॉफच्या प्रेमात पडला होता सुनील शेट्टीचा मुलगा
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी(Suniel Shetty)चा मुलगा आणि अभिनेता अहान शेट्टी (Ahan Shetty) सध्या चर्चेत आहे. अहानचे ११ वर्षे जुने नाते तुटल्याचे वृत्त समोर आले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्याने त्याची गर्लफ्रेंड तानिया श्रॉफ(Taniya Shroff)सोबत ब्रेकअप केले आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, अहान शेट्टी आणि तानिया श्रॉफ यांचे ब्रेकअप होऊन दीड महिना झाला आहे. दोघेही ११ वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होते. अहान आणि तानिया लहानपणापासून एकत्र शिकले आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात पडले. पण आता हे जोडपे वेगळे झाल्याचे बोलले जात आहे.
या कारणामुळे झाले ब्रेकअप?
मात्र, त्यांच्या ब्रेकअपचे कोणतेही कारण अद्याप समोर आलेले नाही. त्याचबरोबर अहान आणि तानियाकडूनही या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण दोघांनीही बऱ्याच दिवसांपासून एकही पोस्ट शेअर केलेली नाही. त्याचवेळी अहान आणि तानिया एकत्र दिसले नाहीत. मात्र दोघेही एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहेत.
कोण आहे तानिया श्रॉफ?
तानिया श्रॉफ प्रसिद्ध मॉडेल आणि उद्योगपती जादेव आणि रोमिला श्रॉफ यांची मुलगी आहे. ती नामांकित उद्योगपतींच्या कुटुंबातील आहे. अहानबद्दल बोलायचे झाले तर, त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आहे. तो तारा सुतारियासोबत 'तडप' चित्रपटात दिसला होता. तानिया श्रॉफ अनेकवेळा सुनील शेट्टीच्या कुटुंबासोबत दिसली आहे. 'तडप'च्या स्क्रिनिंगदरम्यानही ती दिसली होती. सुनील शेट्टीनेही तानियाचा अनेकदा उल्लेख केला आहे. त्याने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो तानियाला आपल्या मुलीप्रमाणे मानतो.