रिल टू रिअल! 'सैयारा' फेम अहान पांडे आणि अनित पड्डा एकमेकांच्या प्रेमात? शेअर केले फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 09:09 IST2025-10-14T09:07:12+5:302025-10-14T09:09:20+5:30
'सैयारा' फेम अहान पांडे आणि अनित पड्डा एकमेकांना करत आहेत डेट?

रिल टू रिअल! 'सैयारा' फेम अहान पांडे आणि अनित पड्डा एकमेकांच्या प्रेमात? शेअर केले फोटो
'सैयारा' फेम अहान पांडे आणि अनित पड्डा सध्या बॉलिवूडमधील नवीन 'हॉट कपल' म्हणून चर्चेत आहेत. मोहित सुरी दिग्दर्शित चित्रपटातून अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी धमाकेदार बॉलिवूड डेब्यू केलं. या चित्रपटाने 'आशिकी' आणि 'रॉकस्टार'ची जादू पुन्हा निर्माण केली आणि बॉक्स ऑफिसचे रेकॉर्ड मोडले. अहान आणि अनितची चित्रपटातील केमिस्ट्री प्रेक्षकांना इतकी आवडली की, 'सैयारा' प्रदर्शित झाल्यापासून ही जोडी रिअल लाईफमध्येही एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अहान पांडेने नुकतेच सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या अफेअरच्या चर्चांना अधिक हवा मिळाली आहे. अहानने नुकताच अनित पड्डाचा प्री-बर्थडे सेलिब्रेशन केलं. त्याचे फोटोही अभिनेत्यानं चाहत्यांसाठी इन्स्टा स्टोरीमध्ये पोस्ट केले आहेत. फोटोंमध्ये अहान पांडे आणि अनित पड्डा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसत आहेत. त्यांच्यातील केमिस्ट्री आणि जवळीक स्पष्टपणे दिसून येत आहे. या खास फोटोंसह अहानने अनितला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
कामाबद्दल बोलायचं झालं तर 'सैयारा' हा हीट चित्रपट दिल्यानंतर अहान पांडे लवकरच अली अब्बास जफरच्या एका चित्रपटात शर्वरी वाघसोबत दिसणार आहे. तर अनित पड्डा मनीष शर्माच्या आणि 'न्याय' नावाच्या आणखी एका चित्रपटात दिसणार आहे.