नातू अगस्त्य नंदाचा 'इक्किस' ट्रेलर पाहून अमिताभ बच्चन भावुक, नातवासाठी लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 10:09 IST2025-10-30T09:47:16+5:302025-10-30T10:09:50+5:30
आपल्या लाडक्या नातवाचा अभिनय पाहून अमिताभ यांनी पोस्ट शेअर करत त्याचं कौतुक केलंय.

नातू अगस्त्य नंदाचा 'इक्किस' ट्रेलर पाहून अमिताभ बच्चन भावुक, नातवासाठी लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट
बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी आता मोठ्या पडद्यावर आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्यानंतर आता श्वेता बच्चन नंदा यांचा मुलगा अगस्त्य नंदा अभिनय क्षेत्रात उतरला आहे. अगस्त्यने झोया अख्तरच्या 'द आर्चीज' (The Archies) या ओटीटी चित्रपटातून पदार्पण केले असले तरी, आता तो 'इक्किस' (Ikkis) या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर डेब्यू करत आहे. 'इक्कीस' सिनेमाचा बहुचर्चित ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून अगस्त्य नंदाच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आपल्या लाडक्या नातवाचा अभिनय पाहून अमिताभ यांनी त्यांचं कौतुक केलंय.
अमिताभ यांनी त्यांच्या सोशल मीडियावर 'इक्किस'चा ट्रेलर शेअर करत अगस्त्यसाठी एक अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहलं, "अगस्त्य! जेव्हा तू जन्माला आलास, तेव्हा मी तुला माझ्या हातात धरले होते. त्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा तुला हातात घेतलं आणि तू तुझ्या नाजूक बोटांनी माझ्या दाढीशी खेळायला सुरुवात केली होती. आज, तू जगभरातील चित्रपटगृहांमध्ये चमकत आहेस. तू खास आहेस. माझ्या प्रार्थना आणि आशीर्वाद नेहमीच तुझ्यासोबत आहेत.तू नेहमी आपल्या कामातून यश मिळव आणि आपल्या कुटुंबाचा अभिमान वाढवत राहा".
T 5548(i) -https://t.co/Qz7cU2DSRq
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 29, 2025
Agastya ! I held you in my hands as soon as you were born .. few months later, I held you again in my hands and your soft fingers reached out to play with my beard ..
TODAY you play in Theatres all over the World ..
You are SPECIAL .. all my…
काय आहे 'इक्किस' चित्रपट?
'इक्किस' हा चित्रपट श्रीराम राघवन यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. चित्रपटामध्ये २१ वर्षीय लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांची शौर्यगाथा दाखवण्यात आली आहे, ज्यांची भूमिका अगस्त्य नंदा साकारली आहे. अगस्त्य नंदासोबतच या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र, जयदीप अहलावत, आदिंशी कपूर आणि सिकंदर खेर हे कलाकार देखील महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
