Amruta Fadnavis: गाण्यानंतर सिनेमात काम करणार का?,अमृता फडणवीस स्पष्टच म्हणाल्या....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 18:31 IST2023-01-07T18:26:23+5:302023-01-07T18:31:22+5:30
अमृता फडणवीस आता 'मूड बना लेया वे' हे पंजाबी गाणं घेऊन आल्या आहेत. गाण्याच्या लॉन्चिंग सोहळ्यात अमृता फडणवीस यांच्याशी 'लोकमत'नं केलेल्या खास गप्पा मारल्या.

Amruta Fadnavis: गाण्यानंतर सिनेमात काम करणार का?,अमृता फडणवीस स्पष्टच म्हणाल्या....
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गायन क्षेत्रात ही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. गेल्या काही वर्षात त्यांनी आपल्या गाण्याचा छंद जोपासत अनेक गाणी प्रेक्षकांसाठी आणली. आता आणखी एक नवं गाणं त्या घेऊन आल्या आहेत. अमृता फडणवीस आता 'मूड बना लेया वे' हे पंजाबी गाणं घेऊन आल्या आहेत. नुकतंच त्यांचं हे नवं गाणं प्रदर्शित झालं आणि याही गाण्याचा चांगली पसंती मिळत आहे. गाण्याच्या लॉन्चिंग सोहळ्यात अमृता फडणवीस यांच्याशी 'लोकमत'नं केलेल्या खास गप्पांमध्ये त्यांनी गाण्याबद्दल माहिती तर दिलीच पण इतरही विषयांवर दिलखुलासपणे संवाद साधला.
गाण्याबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या, मीत ब्रदर्सबरोबर एक जॅमिंग सेशन झालं होतं. त्यात हे गाणं त्यांनी मला ऐकवलं होतं. जे भूषणजीना माझ्यासाठी आवडलं होतं. ते ऐकल्यावर मला लगेचं आवडलं. ते गाऊन पाहिल्यावर आमचा असा विचार ठरला ते माझ्या आवाजाला सुट करतंय. ते मी रेकॉर्ड केलं पूर्ण पंजाबी गाणं आहे ते. मला पंजाबी काही कळंत नाही, बोलता तर येतंच नाही. मीत बर्दस यांच्या स्टुडिओमध्ये ते रेकॉर्ड केलं. त्यावेळी तेही होते तिथं. ते गाणं मी ऐकलं नंतर स्पीचसारखं फक्त बोलले पंजाबी शब्दांचे उच्चार तसं यायला हवं होतं. चाल माझ्या लक्षात होती म्हणून फक्त एक बोलू शकले त्यानंतर मी ते रेकॉर्ड केलं आणि त्यात मला मीत बदर्सनी खूप मदत केली. देवेंद्रजींना पण हे गाणं खूप आवडल्याचं त्यांनी सांगितलं.
गाण, डान्स यानंतर सिनेमात येण्याचं काही प्लनिंग आहे का असा प्रश्न विचारताच त्या म्हणाल्या, सिनेमात येण्याच माझं काहीच प्लनिंग नाही. मी जे गातं त्यात माझे इमोशन असतात त्या हिशोबाने मी अॅक्ट करते आणि त्यातच मला समाधान आहे.