मोठ्या मनाची मालकीण! RCB विरुद्धच्या पराभवानंतर प्रीती झिंटा दुःखी, पण 'या' कृतीने जिंकलं सर्वांचं मन
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:52 IST2025-06-04T11:50:26+5:302025-06-04T11:52:23+5:30
Preity Zinta Emotional Video: IPL च्या फायनल सामन्यात प्रीती झिंटाची टीम हरल्यावर अभिनेत्रीला चांगलंच दुःख झालेलं दिसलं. पण तरीही तिच्या एका कृतीने सर्वांचं मन जिंकलं.

मोठ्या मनाची मालकीण! RCB विरुद्धच्या पराभवानंतर प्रीती झिंटा दुःखी, पण 'या' कृतीने जिंकलं सर्वांचं मन
काल IPL फायनल पार पडली. या फायनलमध्ये RCB ने PBKS चा पराभव केला. प्रीती झिंटा मालकीण असलेली PBKS टीम यंदाच्या संपूर्ण हंगामात चांगली खेळली. याच खेळाच्या जोरावर PBKS ने फायनलमध्ये मजल मारली. पण शेवटी अटीतटीच्या लढाईत RCB ने PBKS ला हरवल्याने संघमालकीण प्रीती झिंटाला चांगलंच दुःख झालेलं दिसलं. प्रीती झिंटाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये ती उदास दिसत असली तरीही तिच्या एका कृतीने सर्वांचं मन जिंकलंय.
PBKS हरल्याने प्रीतीचा चेहरा पडला
RCB ने हरवल्यावर PBKS चा पराभव प्रीतीच्या जिव्हारी लागलेला दिसतोय. प्रीती झिंटाचे भावनिक क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रीती झिंटा सामना संपल्यानंतर प्रचंड दुःखी दिसली. परंतु तरीही तिने PBKS च्या खेळाडूंना धीर दिला. प्रीतीचे डोळे पाणावले होते. तिचे फोटो पाहून तिच्या चाहत्यांनाही दुःख झालं. पण प्रीती तिच्या टीमला करत असलेला सपोर्ट पाहून अनेकांनी तिच्या या कृतीचं कौतुक केलं.
#PreityZinta has tears in her eyes, as expected. She's heartbroken again. I saw similar visuals in 2014. 💔#RCBvPBKS#IPL#IPL18#IPL2025#TATAIPL#Ahmedabad#Finalpic.twitter.com/mSG9e1gdKJ
— Tejan Shrivastava (@BeingTeJan) June 3, 2025
प्रीती झिंटा गेल्या १८ वर्षांपासून पंजाब किंग्ज संघाच्या सोबत आहे. काल RCB ने PBKS ला हरवल्याने पंजाब किंग्जचं आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न अधूरं राहिलं. पण या संपूर्ण हंगामात PBKS च्या प्रत्येक सामन्यावेळेस प्रीती झिंटा संघाला सपोर्ट करताना स्टेडियमवर उपस्थित राहायची. फायनलच्या वेळेसही प्रीतीने प्रचंड दुःख झालं असूनही ते लपवलं आणि संघाच्या सर्व सहकाऱ्यांना धीर द्यायला मैदानावर आली. प्रीतीने RCB च्या खेळाडूंचेही अभिनंदन केले. एकूणच प्रीतीची खिलाडूवृत्ती सर्वांना दिसली.