पहलगाम हल्ल्यानंतर आमिर खाननं घेतला मोठा निर्णय! जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 10:12 IST2025-04-30T10:11:27+5:302025-04-30T10:12:13+5:30

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लोकप्रिय अभिनेता आमिर खानने मोठा निर्णय घेतला आहे.

After Pahalgam Terror Attack, Aamir Khan Postpones 'sitare Zameen Par' Trailer | पहलगाम हल्ल्यानंतर आमिर खाननं घेतला मोठा निर्णय! जाणून घ्या...

पहलगाम हल्ल्यानंतर आमिर खाननं घेतला मोठा निर्णय! जाणून घ्या...

Aamir Khan: काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचा देखील समावेश आहे.या दहशतवादी हल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही (Bollywood Celebrity) या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आणि बदला घेण्याची मागणीही केली. अशातच लोकप्रिय अभिनेता आमिर खानने मोठा निर्णय घेतला आहे.

आमिर खान याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर या आठवड्यात प्रदर्शित होणार होता. पण, आता दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर ट्रेलर लाँच पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता  'सितारे जमीन पर'चा ट्रेलर पुन्हा कधी प्रदर्शित होईल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. लवकरच नवीन रिलीज तारीख जाहीर केली जाईल.  'सितारे जमीन पर' हा आमिर खानच्या २००७ मध्ये आलेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सिक्वेल आहे. आमिरसोबत या सिनेमात जेनेलिया देशमुख मुख्य भूमिकेत दिसणार आहे

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर फक्त आमिर खान हाच नाहीतर सलमान खाननेही त्याचा युके दौरा पुढे ढकलला आहे. तसेच प्रसिद्ध गायकांनीही आपले आयोजित कॉन्सर्ट रद्द केले आहेत. यात श्रेया घोषाल, बादशाह, अरिजित सिंह हे आहेत.  गेल्या सहा वर्षांतील काश्मीरमधील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता. संपूर्ण देश दहशतवाद्यांविरुद्ध एकच आवाजात उठवत आहेत. 

भारतात पाकिस्तानी चित्रपटांवर बंदी (Pakistani Films Banned in India) घालण्यात आली आहे. यावर कारवाई करत भारतानं पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या 'अबीर गुलाल' या चित्रपटाच्या भारतात प्रदर्शनावरही बंदी घातली आहे. तर हानिया आमिर 'सरदार जी 3' या चित्रपटातून भारतीय चित्रपटसृष्टीत प्रवेश करणार होती. मात्र, हल्ल्यानंतर तिला एका रात्रीत रिप्लेस करण्यात आलं आहे. 

Web Title: After Pahalgam Terror Attack, Aamir Khan Postpones 'sitare Zameen Par' Trailer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.