'धुरंधर'नंतर आता बॉलिवूडकरांना 'टॉक्सिक'ची धडकी! वरुण धवनच्या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 14:51 IST2026-03-10T14:49:15+5:302026-03-10T14:51:18+5:30
टॉक्सिक' सिनेमा 'धुरंधर २' सोबत रिलीज होणार होता. परंतु 'टॉक्सिक'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. परंतु आता 'टॉक्सिक'मुळे वरुण धवनच्या एका आगामी सिनेमाला मोठा फटका बसला आहे. जाणून घ्या सविस्तर

'धुरंधर'नंतर आता बॉलिवूडकरांना 'टॉक्सिक'ची धडकी! वरुण धवनच्या सिनेमाची रिलीज डेट पुढे गेली
'धुरंधर २' सिनेमाची सध्या खूप चर्चा आहे. या सिनेमाच्या रिलीज डेटमुळे अनेक सिनेमांची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. यशचा 'टॉक्सिक' सिनेमा 'धुरंधर २' सोबत रिलीज होणार होता. परंतु 'टॉक्सिक'ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. परंतु आता 'टॉक्सिक'मुळे वरुण धवनच्या एका आगामी सिनेमाला मोठा फटका बसला आहे. जाणून घ्या सविस्तर
डेव्हिड धवन दिग्दर्शित आगामी रोमँटिक फिल्म 'है जवानी तो इश्क होना है' जूनमध्ये रिलीज होणार होती. परंतु आता टॉक्सिकमुळे 'है जवानी तो इश्क होना है' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. 'टॉक्सिक'सोबत वाद टाळण्यासाठी वरुण धवनने आणि सिनेमाच्या निर्मात्यांनी 'है जवानी तो इश्क होना है' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली आहे. आधी हा सिनेमा ५ जूनला रिलीज होणार होता. पण आता हा सिनेमा १२ जूनला रिलीज होणार आहे.
त्यामुळे वरुण धवनच्या चाहत्यांची चांगलीच निराशा आहे. 'टॉक्सिक' सिनेमा ४ जूनला रिलीज होणार आहे. त्यामुळे सध्यातरी 'टॉक्सिक' सिनेमाला अन्य कोणत्याही सिनेमाची टक्कर नाही. 'है जवानी तो इश्क होना है' सिनेमाबद्दल सांगायचं तर या सिनेमात वरुण धवन, जिमी शेरगिल, मृणाल ठाकूर, पूजा हेगडे हे कलाकार झळकणार आहेत. रोमँटिक कॉमेडी असणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन वरुण धवनचे वडील डेव्हिड धवन करत आहेत.