अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर 'दृश्यम ३' मध्ये 'या' अभिनेत्याची एन्ट्री! अजय देवगणला देणार टक्कर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 10:32 IST2026-02-11T10:30:57+5:302026-02-11T10:32:09+5:30
'दृश्यम ३' मध्ये 'या' अभिनेत्याची लागली वर्णी! पोस्ट शेअर करत दिली माहिती

अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर 'दृश्यम ३' मध्ये 'या' अभिनेत्याची एन्ट्री! अजय देवगणला देणार टक्कर
Drishyam 3: अजय देवगण स्टारर 'दृश्यम' फ्रँचायझी ही बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय फ्रँचायझीपैकी एक आहे. या चित्रपटाचे दोन भाग आतापर्यंत प्रदर्शित झाले आहेत आणि दोन्ही भाग प्रेक्षकांनी पसंतीस उतरले. पहिल्या दोन भागांच्या यशानंतर लवकरच या फ्रॅचायझीचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. मागील काही महिन्यांपासून सिनेसृष्टीत या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा रंगली. दृश्यम ३ मधून अभिनेता अक्षय खन्नाच्या एक्झिटनंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.त्यानंतर आता चित्रपटात नवीन एन्ट्री झाल्याची माहिती समोर आली आहे.
Started shooting for this engaging franchise #Drishyam3 in hindi. With a wonderful team and a scintillating role to play . Im sure you will love it . ❤️❤️❤️( and yes im not replacing anyone..) 😛😛😛
— Prakash Raj (@prakashraaj) February 10, 2026
अक्षय खन्नाने दृश्यम ३ चित्रपट सोडल्यानंतर आता त्यामध्ये एका सुपरस्टारची वर्णी लागली आहे. हा अभिनेता थेट अजय देवगणसोबत भिडताना दिसणार आहे. हे अभिनेते दुसरे कोणी नसून प्रकाश राज आहेत. प्रकाश राज यांनी आपल्या सोशल मिडिया अकाउंटवर पोस्ट शेअर करत 'दृश्यम ३'मध्ये त्यांची झाल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे. मात्र, या पोस्टमध्ये आपण अक्षय खन्नाला रिप्लेस केलं नाही,असं स्पष्ट देखील केलं आहे.
बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, प्रकाश राज यांनी चित्रपटाचं शू्टिंग सुरु केलं आहे. त्याचबरोबर दृश्यम-३ मध्ये ते एका वेगळ्याच अंदाजात दिसणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे सिनेरसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.दरम्यान, दृश्यम ३ च्या दिग्दर्शनाची धुरा अभिषेक पाठक यांच्या खांद्यावर आहे. हा बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित चित्रपट २ ऑक्टोबर २०२६ ला रिलीज करण्यात येणार आहे.