अदनान सामीचं पुन्हा वाढलं वजन, कुटुंबासोबत दिसला लोकप्रिय गायक; नेटकरी म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 12:47 IST2025-10-31T12:42:30+5:302025-10-31T12:47:08+5:30
अदनान सामीविषयी 'हे' माहितीये का?

अदनान सामीचं पुन्हा वाढलं वजन, कुटुंबासोबत दिसला लोकप्रिय गायक; नेटकरी म्हणतात...
लोकप्रिय गायक अदनान सामी सध्या चर्चेत आहे. गेल्या काही वर्षात अदनान सामीने कमालीचं वजन घटवलेलं सर्वांनी पाहिलं होतं. मात्र आता पुन्हा त्याचं वजन वाढलेलं दिसत आहे. अदनान सामी जुन्या लूकमध्येच परत आला आहे. एकेकाळी त्याचं वजन २३० किलो होतं. नंतर त्याने ते कमी केलं होतं. याची खूप चर्चा झाली होती. आता त्याचा लेटेस्ट लूक पाहून चाहतेही शॉक झाले आहेत.
अदनान सामी नुकताच कुटुंबासोबत मुंबई विमानतळावर दिसला. त्याच्यासोबत पत्नी आणि मुलगी होती. अदनान सामीने ब्लॅक ओवरसाईज टीशर्ट आणि निळी जीन्स परिधान केली आहे. मात्र नेटकऱ्यांचं लक्ष त्याच्या वाढलेल्या वजनाकडे गेलं. तो पुन्हा आधीच्याच शेपमध्ये आल्याचं दिसत आहे.
'ये फिर से मोटे हो गए है','अदनानने डाएटिंग बंद केली का','वजन कमी करुन काय फायदा, जर पुन्हा स्थूलच व्हायचं आहे','ऋषी कपूर वाटत आहे','जुन्या फॉर्ममध्ये परत जात आहे' अशा कमेंट्स या व्हिडीओवर आल्या आहेत.
अदनान सामीने चार लग्न केली आहेत. १९९३ साली त्याने जेबा बख्तियारशी लग्न केलं. त्यांना अजान सामी थान हा मुलगा आहे. तीन वर्षांनंतर त्याचा जेबासोबत घटस्फोट झाला. २००१ साली त्याने दुबईच्या अरह सुबाह गलदारीशी दुसरं लग्न केलं. दीड वर्षातच त्यांचा संसार मोडला. २००८ साली अदनानने अरबसोबत पुन्हा लग्न केलं. मात्र एक वर्षात त्यांनी पुन्हा घटस्फोट घेतला. २०१० मध्ये अदनानने रोया सामी खानशी लग्न केलं. लग्नाच्या ७ वर्षांनंतर त्यांना मेदिना ही मुलगी झाली.
