तापसी नंतर आदिती राव हैदरीनीही केलं गुपचूप लग्न, देवळात सिद्धार्थसोबत बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 13:50 IST2024-03-27T13:49:46+5:302024-03-27T13:50:22+5:30

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नूनंतर आता आदिती राव हैदरीने बॉयफ्रेंड सिद्धार्थसोबत गुपचुप लग्न केल्याची चर्चा आहे. दोघांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालाय

Aditi Rao Hydari secretly married Siddharth in Sri Ranganayakaswamy Temple | तापसी नंतर आदिती राव हैदरीनीही केलं गुपचूप लग्न, देवळात सिद्धार्थसोबत बांधली लग्नगाठ

तापसी नंतर आदिती राव हैदरीनीही केलं गुपचूप लग्न, देवळात सिद्धार्थसोबत बांधली लग्नगाठ

बॉलिवूडमधली लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नूने काहीच दिवसांपुर्वी तिच्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं. आता तापसीनंतर आदिती राव हैदरीने तिचा बॉयफ्रेंड आणि सुप्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थसोबत लग्नगाठ बांधली आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर, आज २७ मार्चला तेलंगणा येथील श्रीरंगम रंगनाथम स्वामी मंदिरात एकमेकांसोबत विवाह केला. मोजके नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत या दोघांचा विवाह संपन्न झाला.

आदिती - सिद्धार्थने त्यांच्या लग्नाचा कुठेही गाजावाजा न करता गुपचुप लग्न उरकलं आहे. तामिळनाडू मधील पुजाऱ्यांना लग्नविधीसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. आपल्या परंपरा आणि संस्कृतींचं जतन करण्यासाठी आदिती-सिद्धार्थ दोघांनीही पारंपरिक थाटात लग्न करण्याचा निर्णय घेतला. आदिती-सिद्धार्थ दोघांचेही कुटुंबिय या लग्नाला उपस्थित असून आनंदी होते. 

२०२१ मध्ये तेलगू सिनेमा 'समुद्रम'च्या सेटवर आदिती-सिद्धार्थमध्ये चांगली मैत्री निर्माण झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात होऊन दोघेही एकमेकांना डेट करु लागले. सुरुवातीला या दोघांनीही त्याचं नातं गुप्त ठेवलं असलं तरीही नंतर मात्र त्यांनी अधिकृतपणे नात्याचा जाहीर खुलासा केला.आदितीचं हे दुसरं लग्न असून तिने याआधी सत्यदीप मिश्रासोबत लग्न केलं होतं. आदिती-सिद्धार्थने अजुन अधिकृतरित्या लग्नाचा कोणताही खुलासा केला नाहीय. दोघांच्या लग्नाच्या फोटोंची त्यांच्या चाहत्यांना आतुरता आहे.

 

Web Title: Aditi Rao Hydari secretly married Siddharth in Sri Ranganayakaswamy Temple